एक्स्प्लोर

बाप्पाचं आगमन! फुलांच्या सुगंधानं बाजार बहरला, गुलछडीला सर्वाधिक भाव, कोणत्या फुलाला किती दर? 

Increase Demand for Flowers : बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ (Increase demand for flowers) झाली आहे. यामुळं दरात देखील वाढ झाली आहे.

Increase Demand for Flowers : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धामधूम पाहायला मिळत आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने लाडक्या गणपतीच्या पूजा साहित्य आणि नैवेद्याच्या खरेदीसाठी बाजारांमध्ये सर्वत्र नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. फळे-फुले आणि लाडक्या बाप्पाला चढवला जाणाऱ्या आवडीच्या 21 भाज्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ (Increase demand for flowers) झाली आहे. यामुळं दरात देखील वाढ झाली आहे. याचा फुल उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. 

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात फूल खरेदी करण्यासाठी गर्दी 

आपला लाडका बाप्पा खुलून दिसावा यासाठी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात फूल खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. झेंडू, गुलाब, चमेली अश्या विविध प्रकारची फुल आहेत. फुलांची मागणी वाढल्यामुळं दरात देखील मोठी वाढ झाली आहे. याबाबतची माहिती फूल मार्केटचे अध्यक्ष अरुण हरिभाऊ वीर यांनी दिली आहे.  

बाजारात कोणत्या फुलाला किती दर? 

झेंडू : 50 ते 80 रुपये किलो 
शेवंती: 150 ते 200 रुपये किलो 
गुलाब: 200 रुपायाला 20 फूल 
अस्टर: 250 ते 300 रुपये किलो 
बिजली : 200 ते 250 रुपये 
लिली : 50 रुपये किलो 
गुलछडी : 1400 रुपये किलो 

बाजारात सध्या गुलछडी सगळ्यात महाग आहे. प्रति किलो गुलछडी खरेदी करण्यासाठी 1400 रुपये मोजावे लागत आहेत. आवक कमी असल्याने गुलछडी महाग झाली आहे.  यंदा निशीगंधा फुलाने देखील भाव खाल्ला आहे. बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या पांढऱ्या निशीगंधा म्हणजेच गुलछडी यंदा चांगलाच भाव खाताना दिसत आहे. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये सुका मेवा पेक्षाही महाग किंमतीने निशीगंधा विकला जातोय.

दादर मार्केटमध्येही फुल खरेदीसाठी मोठी गर्दी

दादर फूल मार्केटमध्येही फुल खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. मात्र महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने मार्केटला फटका बसला आहे. आलेली फुले मोठ्या प्रमाणात भिजली असल्याने सडून जात आहेत. चांगल्या फुलांची दुप्पट ते पाच पट किंमत वाढली आहे. यातच प्लॅस्टिक च्या फुलांची वाढलेली खरेदी यामुळं देखील मार्केटमधील व्यापारी त्रस्त आहेत.

दादर फूल मार्केटमध्ये कोणत्या फुलाला किती दर? 

झेंडू नेहमी 40 आज 110
गुलाब नेहमी 80 आज  110
गुलछडी नेहमी 200 आज 1000
शेवंती  नेहमी 100 आज 300 ते 400 
जास्वंदी नेहमी 50 आज 500 शेकडा
दुर्वा जूडी नेहमी 10 आज 30 ते 40 
कापरी नेहमी  50 आज 120 
अष्टर नेहमी  120 आज 200

महत्वाच्या बातम्या:

Pune Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवाला पुणं दुमदुमणार! 5 मानाचे गणपती आणि त्यांचे अनोखे देखावे, काय आहे अनेक वर्षांची वैभवशाली परंपरा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narhari Zirwal : जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट
जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट
Siddharth Aditi Marriage  : गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्‍यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्‍यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
Majra Dam: मांजरा धरण भरण्याचा मार्गावर, बीडसह लातूर धाराशिवचंही कृषी सिंचन वाढणार किती झालाय साठा?
मांजरा धरण भरण्याचा मार्गावर, बीडसह लातूर धाराशिवचंही कृषी सिंचन वाढणार किती झालाय साठा?
धनगर-धनगड जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध, म्हणाले, आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का?
धनगर-धनगड जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध, म्हणाले, आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil On Vishal Patil  : पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, विशाल पाटलांवर संजय पाटलांची टीकाSanjay Gaikwad : Rahul Gandhi यांची  जीभ छाटणाऱ्याला 11 लाख; शिंदेंच्या आमदारांचं धक्कादायक वक्तव्यSharad Pawar Vs Ajit Pawar : महिला सुरक्षा सरकारचं प्राधान्य, पवारांच्या टीकेला दादांचं प्रत्युत्तरNarhari Zirwal : धनगडमधून आरक्षण देऊ नये, आदिवासी समाजाचा विरोध : झिरवाळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narhari Zirwal : जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट
जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट
Siddharth Aditi Marriage  : गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्‍यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्‍यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
Majra Dam: मांजरा धरण भरण्याचा मार्गावर, बीडसह लातूर धाराशिवचंही कृषी सिंचन वाढणार किती झालाय साठा?
मांजरा धरण भरण्याचा मार्गावर, बीडसह लातूर धाराशिवचंही कृषी सिंचन वाढणार किती झालाय साठा?
धनगर-धनगड जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध, म्हणाले, आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का?
धनगर-धनगड जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध, म्हणाले, आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का?
Gulabrao Patil : एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्...; गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी
एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्...; गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी
Maharashtra Rain ALert: बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी राहणार का? हवामान विभागाचा अंदाज काय?
बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी राहणार का? हवामान विभागाचा अंदाज काय?
Manoj Jarange: सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार: मनोज जरांगे
सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार: मनोज जरांगे
ST Employee: एसटी कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
ST कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
Embed widget