एक्स्प्लोर

Ganeshostav 2023 : विघ्नहर्ता, लंबोदर, शूर्पकर्ण बाप्पाची ही नावं तर माहितच असतील, पण गणपतीची 'ही' नावं कधी ऐकली आहेत का?

Ganeshostav 2023 : गणपीतीची अनेक नावं आपल्या सर्वांना माहितच आहेत. पण गणपीतीच्या कधीही न ऐकलेल्या नावांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मुंबई : सध्या बाप्पाच्या (Ganeshostav) आगमनाची तयारी घरोघरी सुरु आहे. वर्षभर ज्या सणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात त्या लाडक्या बाप्पाचा सण अखेरीस आला आहे. त्यामुळे सध्या मंगलमय आणि प्रसन्नतेचे वातावरण पाहायला मिळतय. खरतरं बाप्पाला अनेक नावांनी ओळखलं जातं, पुजलं जातं. विघ्नांचा नाश करणारा विघ्नहर्ता, ज्याचे उदर लंब आहे असा लंबोदर, ज्याचे कान सुपासारखे आहेत तो शूर्पकर्ण अशा अनेक नावांनी बाप्पा आपल्या परियचयाचा आहे. पण काही नावं अशी आहेत, ज्यांच्याविषयी क्वचितच आपल्याला माहिती असेल. 

गणपतीच्या प्रत्येक नावाची काहीतरी गोष्ट आहे, महत्त्वपूर्ण असा अर्थ आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक नावाला तितकच महत्त्व आहे. तुम्ही कधी चतुर्होत्र, गुहाग्रज, सुराग्रज, हेमतुण्ड या नावांविषयी ऐकलं आहे का? ही नावं दुसऱ्या कोणाची नाही तर आपल्या लाडक्या बाप्पाचीच आहेत. याचा नावांविषयी सविस्तर जाणून घेऊया. 

बाप्पाच्या 'या' नावांविषयी माहिती आहे का? 

गणपतीची जितकी नावं घ्यावीत तितकी कमी आहेत. पण सुमुख, गुहाग्रज, हेरंब, चतुर्होत्र, सर्वेश्वर, विकट, हेमतुण्ड, वटवे, सुराग्रज अशी देखील काही बाप्पाची नावं आहेत. यातील काही नांवाचा अर्थ देखील तितकाच परिपूर्ण आहे. ज्याचे मुख सुंदर आहे असा सुमुख, जो सर्व देवांमध्ये अग्रगण्य पुजला जातो तो गुहाग्रज, जो विनम्रतेचे पालनक करत तो हेरंब, संकटांचा नाश करणारा विकट, असा अर्थ यातील काही नावांचा आहे. त्यामुळे बाप्पाच्या इतर नावांसोबत या नावांचेही तितकेच महत्त्व आहे. या प्रत्येक नावाची गोष्ट देखील आहे. जशी एकदंत, लंबोदर, विघ्नहर्ता या नावांची गोष्ट आहे. 

तर असे अनेक गणपती आहेत ज्यांच्या नावांचा इतिहास हा अतिशय रंजक आहे. पुण्यातील असे अनेक गणपती त्यांच्या नावांमुळे प्रसिद्ध आहे. पुण्यातील चिमण्या गणपती, मद्रासी गणपती, गुपचूप गणपती, मोदी गणपती, माती गणपती हे गणपती त्यांच्या नावांसाठी प्रामुख्याने ओळखले जातात.  ही नावं पुणेकरांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरुन  दिली असल्याचं देखील म्हटलं जातं. 

मंगळवार (19 सप्टेंबर) रोजी लाडक्या बाप्पाचं आगमन घरोघरी होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी झाली असून पुढील दहा दिवस गणपतीचा पाहुणचार करण्यात येणार आहे. हा हक्काचा पाहुणचार घेण्यासाठी बाप्पा देखील घरोघरी विराजमान होईल. 

हेही वाचा : 

Pune Ganeshotsav 2023 : चिमण्या, मद्रासी, गुपचूप, मोदी, माती गणपती; पुण्यातील गणपती मंदिरांना ही हटके नावं कशी पडली?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Santosh Deshmukh | संतोष देशमुख प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासाABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 03 January 2025Malvan Dolphin Fish Spot : मृत बाळाला वाचवताना डॉल्फिन आईची धडपड कॅमेऱ्यात कैदMurlidhar Mohol on Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरु होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'त्या' बहिणींना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार, नेमका निकष काय?
लाडकी बहीण योजनेच्या जीआरमधील 'ती' महत्त्वाची अट, बहिणींना पडताळणीनंतर 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार
Bajrang Sonawane : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
Embed widget