एक्स्प्लोर

नांदेडमध्ये बिटकॉईन कंपनीचा अनेकांना कोट्यवधींचा गंडा, गुन्हा दाखल

गेन बिटकॉईन कंपनीने नांदेडमधील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.

नांदेड : गेन बिटकॉईन कंपनीने नांदेडमधील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आता या प्रकरणात नांदेडमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये बिटकॉईनचं आकर्षण दिसून येत आहे. मात्र आता यामध्ये फसवणूक होत असल्याचंही समोर आलं आहे. जगभरासह भारतातही चलनाला पर्याय ठरु पाहणाऱ्या बिटकॉईन या डिजिटल चलनाचं जाळं सगळीकडे पसरलं आहे. बिटकॉईनच्या फसवणुकीबाबत आता पोलिसांत गुन्हे दाखल होऊ लागल्याने बिटकॉईनची व्याप्ती उघड होऊ लागली आहे. नांदेड शहरातही या अदृष्य डिजिटल चलनातील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बिटकॉईन सॉफ्टवेअरची गुंतवणूक केल्यास प्रति महिना 10 टक्के व्याजदर मिळण्याचं अमिष दाखवून गेन बिटकॉईन या कंपनीने अनेकांना गंडा घातला. नांदेडमधील अनेकांनी या गेन बिटकॉईन कंपनीशी करार करुन आपले बिटकॉईन सॉफ्टवेअर दिले. सुरुवातीला 2 ते 3 महिने अनेकांना 10 टक्के रक्कम प्राप्त झाली. मात्र त्यानंतर गेन बिटकॉईनकडून गुंतवणूकदारांची फसवणूक सुरु झाली. विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420 आणि 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेडमधील गेन बिटकॉईनचे एजंट बालाजी पांचाळ, राजू मोतेवार, अमोल थोंबाळे आणि मुख्य आरोपी गेन बिटकॉईनचा निर्माता अमित भारद्वाज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल थोंबाळे याला अटक करण्यात आली आहे. गेन बिटकॉईनचा निर्माता अमित भारद्वाज सध्या दुबईमध्ये आहे. संपूर्ण भारतात त्याच्या गेन बिटकॉईनचं जाळं आहे. गेन बिटकॉईनच्या माध्यमातून भारद्वाजने अब्जावधी रुपये कमावल्याची माहिती आहे. दुबईत भारद्वाज आलिशान लाईफ जगतो. भारतात अनेकांना अब्जावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाजपर्यंत पोलिसांचे हात कसे पोहोचणार, हा खरा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget