76 टक्के जंगल क्षेत्र, तरही तापमानाचा पारा 44 अंशाच्या पुढं, 'या' जिल्ह्यात सूर्य ओकतोय आग
जगात सर्वाधिक तापमानाची (Temperature) नोंद विदर्भातील जिल्ह्यात होत आहे. राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातही काल धक्कादायक तापमानाची नोंद झाली आहे.

Maharashtra Weather : जगात सर्वाधिक तापमानाची (Temperature) नोंद विदर्भातील जिल्ह्यात होत आहे. राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातही काल धक्कादायक अशा 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 1992 म्हणजे तब्बल तीन दशकानंतर गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गडचिरोलीकरांसाठी ही एक प्रकारे धोक्याची घंटा मानली जात आहे. तीन दशकानंतर दुसऱ्यांदा गडचिरोलीत सर्वाधिक तापमानाची नोंद
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 76 टक्के वनक्षेत्र
गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे 14 हजार 412 चौरस किलोमीटर आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण 76 टक्के वनक्षेत्र आहे. 2011 च्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार, गडचिरोली जिल्ह्यात 10 हजार 94 चौरस किलोमीटर जंगल क्षेत्र होते. 2019 च्या रिपोर्टनुसार गडचिरोली जिल्ह्यात एकूण 9 हजार 916.94 चौरस किलोमीटर जंगल आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक तापमान 20 मे 1992 रोजी 46.3 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. 23 एप्रिल 2025 रोजी 44.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर 5 जानेवारी 1992 रोजी सर्वात कमी 5.0 डी.से. एवढे तापमान नोंदवले गेले होते.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा उच्चांक हो
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा उच्चांक होताना दिसत आहे. उन्हाच्या चटक्याने नागरिक हैराण झाले आहेत. देशभरासह राज्यात विदर्भात पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वाढत्या तापमानामुळं दुपारी 12 वाजेनंतर रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.. मुख्य चौकात सिग्नलवर हिरवी नेट नसल्याने वाहन धारकांना भर उन्हात उभं राहावं लागतं आहे. नागपूरमध्ये दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत सिग्नल बंद ठेवण्यात आले आहे. मात्र अमरावतीत सिग्नल सुरू असल्याचे नागरिकांना उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रमुख शहरांमधील तापमान 44 अंशांच्या पार गेलं आहे. अमरावतीत तापमानाचा पारा 44.4 अंशावर गेला आहे. तसेच अकोला 44.3, नागपूर आणि वर्धा 44 अंश सेल्सिअस तापमान होते. मागील 2 दिवसांपासून विदर्भातील जिल्हे देशात सर्वात उष्ण तापमानात प्रथम असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापूर्वी देशात सर्वाधिक तापमानाची नोदं चंद्रपुरात झाली होती. चंद्रपुरात सर्वाधिक 44.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. अशातच आता गडचिरोली जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Weather Update: महाराष्ट्र तापला, तापमानाची पन्नाशीकडे झेप! नंदुरबार 45.3 अंश, विदर्भात 3 दिवस अवकाळी, तुमच्या जिल्ह्यात पारा कुठवर?






















