(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gadchiroli Naxal News: गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश, चार नक्षलवाद्यांना अटक
Gadchiroli: गडचिरोलीत नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मिळाले मोठे यश मिळाले आहे
Gadchiroli: गडचिरोलीत नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मिळाले मोठे यश मिळाले आहे. एकूण 18 लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षल्यांना एका विशेष कारवाईत अटक करण्यात आली आहे. अटकेत दोन एसीएम व दोन सक्रिय नक्षल सदस्यांचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावात हे नक्षली येणार असल्याची माहिती पोलीसाना मिळाली होती. त्यानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. नक्षलवादाची हिंसक वाट सोडून नक्षल्यांनी आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन पोलिसांनी या अटकेनंतर केले आहे.
अटक झालेल्या नक्षल्यांमध्ये बापू ऊर्फ रामजी दोघे, मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे, सुमन ऊफ जन्नी कोमटी कुड्यामी आणि अजित ऊर्फ भरतचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित ऊर्फ भरत याने 14 ऑगस्ट 2020 रोजी पोमके कोठी अंतर्गत पोलीस शिपाई दुशांत पंढरी नंदेश्वर यांच्या खुनामध्ये याचा सक्रीय सहभाग होता. तसेच त्यांचा सात खून, तीन चकमक, एक जाळपोळ, एक दरोडा, अशा एकूण 13 गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. तर मारोती गावडे हा गट्टा दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता. त्यांचा एकूण तीन चकमकीच्या गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. सुमन कुड्यामी ही पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिचा वेगवेगळ्या 11 गुन्ह्यांमध्ये समावेश आहे.
नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने या नक्षलवाद्यांवर बक्षीसही जाहीर केलं आहे. यातच बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे याचेवर 8 लाख रूपये. मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे याच्यावर 6 लाख लक्ष रुपये. सुमन ऊफ्र जन्नी कोमटी कुड्यामी हिच्यावर 2 लाख रुपये आणि अजित ऊर्फ भरत यांच्यावर 2 लाख रुपये असे एकूण 18 लाख लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: