एक्स्प्लोर

सोयबीन बोगस बियाणे प्रकरणी तीन कंपन्यांवर फसवणुकीचे गुन्हे

राज्यात बहुतांश जिल्ह्यातून सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. बीड जिल्ह्यातून जवळपास तीन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. या अनुषंगानं तीन कंपन्यांविरोधात बीड शहरामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड : सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणे बीड जिल्ह्यामध्ये एकूण तीन कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात बहुतांश जिल्ह्यातून सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यात एकट्या बीड जिल्ह्यातून जवळपास तीन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. या अनुषंगानं ग्रीन गोल्ड कंपनी वर परळीमध्ये तर जानकी व यशोधा या कंपन्यांवर बीड शहरामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याच अनुषंगानं परळी तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ग्रीन गोल्ड सीड्स या औरंगाबादच्या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे याच प्रमाणे बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये अकोल्याच्या जानकी सीड्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड व हिंगणघाट जिल्हा वर्धा इथल्या यशोधा हायब्रीड सीड्स या कंपन्यावर सुद्धा फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. Parbhani Farmer Suicide सोयाबीन न उगवल्यानं परभणीत शेतकऱ्याची आत्महत्या   यावर्षी पहिल्यांदाच मागच्या काही वर्षांमध्ये जून महिन्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली त्यामुळे पेरणीने जोर धरला होता. बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा पेरा हा जवळपास दोन लाख हेक्टरवर केला जातो. सुरवातीच्या काळामध्ये सोयाबीन पेरल्यानंतर ते उगवत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. मागच्या तीन आठवड्यांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये तीन हजार शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत महाबीजकडून वाढ, शेतकऱ्यांमध्ये संताप कृषी विभागाकडून प्रत्येक तालुक्यामध्ये न उगवलेल्या सोयाबीनचा पंचनामा करण्यासाठी समिती स्थापन केल्या होत्या. त्यानुसार पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाकडून तीन सोयाबीन बियाणे कंपनीच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. दीड कोटी रुपयांची फसवणूक बीड तालुक्यातील 157 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार हे कृषी विभागाकडे केली होती. या शेतकऱ्यांचा एकरी पेरणीचा खर्च दहा हजार रुपये गृहीत धरून 157 शेतकऱ्यांचे एकूण 1 कोटी 57 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं कृषी विभागाने तक्रारीमध्ये म्हटले आहे. बीड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या एकूण 1 कोटी 57 लाख रुपयांचा नुकसान झाले असून या फसवणूक प्रकरणी जानकी व यशोधा या दोन सोयाबीन बियाण्याच्या कंपनी वरती बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल मात्र आणखीही शेतकऱ्यांना मदत नाही पेरलेल्या सोयाबीन उगवले नसल्याचे एबीपी माझाने लक्षात आणून दिल्यानंतर राज्याच्या कृषी मंत्री दादा भुसे यांनी पाहणी दौरा सुद्धा काढला होता. त्यानंतर पंचनाम्याला सुरुवात झाली खरी मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत पोहोचलेली नाही. कृषी विभागाच्या तक्रारीनंतर बोगस सोयाबीन बियाणे देणाऱ्या कंपनीवर कारवाई झाली खरी मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी हा प्रश्न मात्र आणखीही अनुत्तरीतच आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News Live Updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra News Live Updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Chhatrapati Sambhajinagar Crime: शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Prashant Kishor and Sunil Tatkare: मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Embed widget