एक्स्प्लोर
अहमदनगरमध्ये वांबोरी घाटातील धबधब्यात बुडून चौघांचा मृत्यू
राहुरीच्या वांबोरी घाटात असलेल्या धबधब्यावर ही घटना घडली आहे. यातील एका तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे.
अहमदनगर : अहमदनगरमध्ये धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. राहुरीच्या वांबोरी घाटात असलेल्या धबधब्यावर ही घटना घडली आहे. यातील एका तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे.
काल रविवारी संध्याकाळी अहमदनगरमधील पाच मित्र राहुरीजवळच्या वांबोरी घाटातील धबधबा पाहण्यासाठी गेले होते. त्यातील एका मित्राचा पाय घसरला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वच मित्र पाण्यात बुडाले. तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे.
या घटनेत गणेश वायाळ, श्रीराम रेड्डी, युवराज साळुंखे आणि शुभम मोरे या तरुणांचा मृत्यू झाला आहे, तर प्रतीक गायकवाड असं वाचवण्यात आलेल्या मित्राचं नाव आहे. बुडालेले चारही जण अहमदनगर शहर आणि उपनगरातील रहिवासी आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement