एक्स्प्लोर
कौटुंबीक वादातून कोल्हापुरात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या
स्वतःच्या जावयानेच केलेल्या हल्ल्यात सासू, पत्नी, मेहुणा, मेहुणी यांचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर जावई फरार असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत.

कोल्हापूर : कौटुंबीक वादातून कोल्हापूर जिल्ह्यातील यड्राव इथल्या शिरगावे मळ्यात एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्वतःच्या जावयानेच केलेल्या हल्ल्यात सासू, पत्नी, मेहुणा, मेहुणी यांचा मृत्यू झाला.
या घटनेत पत्नी आणि मेहुणा गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे हातकणंगले तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हत्येमागचं नेमकं कारण शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
यड्राव येथे आज पहाटे प्रदीप विश्वनाथ जगताप याने यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने घाव घालून छाया धुमाळ यांच्यावर हल्ला केला. छाया श्रीपती धुमाळ-आयरेकर, सोनाली अभिजित रावण, रोहित श्रीपती धुमाळ, हल्लेखोराची पत्नी रुपाली धुमाळ-जगताप यांच्यावर वार केले.
यामध्ये छाया श्रीपती धुमाळ-आयरेकर, सोनाली अभिजित रावण, रोहित श्रीपती धुमाळ, हल्लेखोराची पत्नी रुपाली धुमाळ-जगताप यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर प्रदीप विश्वनाथ जगताप हा हल्ल्यानंतर पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने घाव घालून खून केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाचे आदेश दिले आहेत. हल्लेखोरांचा माग घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
