शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणेंचा उद्या भाजप प्रवेश, देगलूर पोटनिवडणुकीसाठी साबणेंना भाजपचं तिकीट
शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane)हे उद्या भाजपमध्ये (BJP)प्रवेश करणार आहेत. देगलूर पोटनिवडणुकीसाठी साबणेंना भाजपकडून तिकीट दिलं जाणार असल्याचं समोर आलं आहे.
नांदेड : शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane)हे उद्या भाजपमध्ये (BJP)प्रवेश करणार आहेत. देगलूर पोटनिवडणुकीसाठी साबणेंना भाजपकडून तिकीट दिलं जाणार असल्याचं समोर आलं आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीतही 2014 मध्ये ज्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली त्या समाधान आवताडेंना भाजपनं तिकीट देत निवडून आणलं होतं. आता त्यामुळं या निवडणुकीकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे. साबणे उद्या चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपमधे प्रवेश करणार आहेत. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी सुभाष साबणे आले. तिथं त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची भेट घेतली.
Subhash Sabane : शिवसेनेशी भावनिक नातं सोडताना दुःख होतंय, सुभाष साबणे यांच्या डोळ्यात पाणी
नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस राज्य निवड मंडळाने दिवंगत काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना उमेदवारी द्यावी, अशी पक्षश्रेष्ठींकडे शिफारस केली आहे. जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे अकाली निधन झाल्यामुळे देगलूर बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली आहे.
शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्यावर असणारे देवेंद्र फडणवीस यांची देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणूक उमेदवारी संदर्भात नायगाव - नरसी येथे भेट घेतली. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे हे भाजपावाशी होणार हे निश्चित झालंय. महाविकास आघाडीचे नेते तथा बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीमुळे व शिवसेनेला विश्वासात घेतलं जात नसल्यामुळे शिवसेना सोडून भाजपात जात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेशी भावनिक नातं सोडताना दुःख होतंय, असं सांगताना सुभाष साबणे यांच्या डोळ्यात पाणी आलं.
त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण युती धर्म पाळत नाहीत व आम्ही काँग्रेसला मतदान करत नाही म्हणून मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असून उद्या भाजपात प्रवेश करून देगलूर बिलोली निवडणुकीसाठी निवडणूक रिंगगणात उतरणार असल्याचे ते म्हणाले.