एक्स्प्लोर

ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं निधन

सहकाराचे डॉक्टर अशी ओळख असलेले सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं निधन झालं. पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

पुणे/पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनामुळे निधन झालं. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात सोमवारी (17 ऑगस्ट) रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. पुण्यातील वैकुंठभूमीत आज (18 ऑगस्ट) सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील निस्पृह राजकारणी निर्वतला आहे.

कोरोनाचा फैलाव पंढरपूर परिसरात वाढल्यावर 5 ऑगस्ट रोजी त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आलं होतं. मधुमेह आणि रक्तदाबाच्या त्रासामुळे उपचारादरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वसनावर ठेवण्यात आलं होतं. अखेर काल रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुधाकरपंत परिचारक अखेरपर्यंत जनतेच्या कार्यात मग्न होते. पंतांच्या जाण्याने पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

सुधाकरपंत परिचारक हे पाच वेळा पंढरपूरचे आमदार होते. एसटी महामंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या परिचारक यांची 'सहकाराचे डॉक्टर' म्हणून ओळख होती. अडचणीत असलेल्या अनेक सहकारी संस्थांना त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने बाहेर काढलं. श्रीपूर इथल्या पांडुरंग सहकारी साखर कारखाना तसंच मोहोळ तालुक्याती भीमा सहकारी साखर कारखान्याचं अनेक वर्ष नेतृत्त्व केलं होतं.

सुधाकरपंत परिचारक गेले दोन दिवस व्हेंटिलेटरवर होते. काल रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचं कोरोनामुळे निधन झालं. कोरोनाच्या नियमावलीत पुण्यात सर्व अंत्यविधी पार पडतील, अशी माहिती नातू प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवरुन दिली.

सुधाकरपंत परिचारक यांचा अल्पपरिचय - सुधाकरपंत परिचारक यांनी 25 वर्षे विधानसभेत पंढरपूर मतदारसंघाचे नेतृत्त्व केलं आहे. 1985 ते 2009 पर्यंत ते आमदार होते. तर 1999 ते 2008 इतका दीर्घकाळ ते राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष होते. - सुधाकरपंत परिचारक जवळपास 50 वर्षाहून अधिक काळ सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकारात अखेरपर्यंत सक्रिय होते. - सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक, दूध संघ, जिल्हा परिषद यासह अनेक संस्थांवर त्यांचा शब्द महत्त्वाचा मानला जात होता. - सुरुवातीला वसंतदादा पाटील गटात काम करणारे सुधाकरपंत राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. ही विधानसभा मात्र त्यांनी भाजप पुरस्कृत आघाडीकडून लढवली होती. - सध्या ते श्रीपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते.

महत्त्वाच्या बातम्या

पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget