एक्स्प्लोर
पाथर्डीतील पोलिस मारहाण प्रकरणी भाजपचे सहा कार्यकर्ते अटकेत
अहमदनगर : पाथर्डीत पोलीस कॉन्स्टेबल महादेव शिंदे यांना मारहाण करणारे सहाही जण भाजपचे कार्यकर्ते असल्याचं समोर आलं आहे.
बुधवारी दुपारी बीड जिल्ह्यातून परमेश्वर कर्डिले, सचिन गव्हाणे, बाळू गव्हाणे, पप्पू गव्हाणे, बाबू कर्डिले, सचिन गव्हाणेला अटक करण्यात आली. पण भाजपशी संबंधित असल्यानंच या सहा जणांवर कारवाई करण्यास उशीर झाल्याचीही चर्चा आहे.
बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी कारवाई करत सहा जणांना अटक केली. पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अल्हनवाडी सोसायटीच्या मतदानावेळी रविवारी म्हणजेच 23 ऑक्टोबरला ही घटना घडली. त्यानंतर तीन दिवसांनी कारवाई करण्यात आली. पाथर्डीमध्ये निवडणुकीच्या बंदोबस्तावर असलेले पोलिस कॉन्स्टेबल महादेव शिंदे यांना जमावाने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत शिंदे जखमी झाले आहेत.
काय आहे प्रकरण?
पाथर्डीत अल्हनवाडी सोसायटीच्या मतदानावेळी मतदान टेबलाजवळील गर्दी झाली. त्यामुळे शिंदे यांनी मतदारांना रांगेत उभे राहण्यास सांगितलं आणि काठी उगारली. त्यावेळी झालेल्या शाब्दिक वादावादीनंतर गर्दीतील एकाने शिंदे यांचा हात धरुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या जमावानं शिंदेंना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी पोटावर आणि छातीवर बेदम मारहाण केली.
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया :
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याचे आदेश आपण दिले असून फरारी आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपला पूर्ण पाठिंबा आहे, जर कुणी या तपासावेळी विलंब केला तर त्याच्यावरही कडक कारवाई केली जाईल असं केसरकर यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी नेते जयंत पाटलांची सरकारवर टीका :
पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला कात्रीत पकडलं आहे. अशाप्रकारे सतत व्हायला लागलं तर कायदा व सुव्यवस्था कोण राखणार? त्यामुळे सरकारनं आत्मपरिक्षण करणं गरजेचं असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. तसंच अशा प्रकारच्या घटनांमुळे पोलिसांचं अध:पतन होत आहे. या प्रकरणी सरकारचं अपयश आहे. सरकारला याचं विशेष गांभीर्य नाही. मताचं राजकारण याची प्रवृत्ती वाढली असल्याची टीकाही जयंत पाटलांनी केली.
संबंधित बातम्या :
अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या बंदोबस्तावरील पोलिसाला मारहाण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement