एक्स्प्लोर

Navratri Special | तुम्ही म्हणाल हिच खरी दुर्गा! भंडारा जिल्ह्यातील पहिली महिला ट्रक्टर मॅकॅनिकल इंजिनियर

आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. याच निमित्ताने एका दुर्गेची कहाणी. भंडारा जिल्ह्यातील धनश्री हातझाडे बनली पहिली महिला ट्रॅक्टर मॅकॅनिकल इंजिनियर

भंडारा : महिलांना कार किंवा ट्रक चालविताना आपण पाहिलं असेलच. मात्र, महिलांना ट्रॅक्टर दुरुस्त करताना कधी बघितलं आहे का? आज अशाच एका 22 वर्षीय ध्येय वेड्या ट्रॅक्टर मॅकॅनिक इंजिनियर तरुणीची ओळख करुन देणार आहोत. या तरुणीचे नाव आहे धनश्री हातझाडे. असे काम करणारी धनश्री ही भंडारा जिल्ह्यातील नाही तर राज्यातील पहिली युवती ठरली आहे.

धनश्रीने प्राथमिक शिक्षण साकोली येथे घेत नागपुरात मॅकॅनिक इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर मोठ्या कंपनीत नोकरी न शोधता आपल्या वडिलांच्या 40 वर्षे जुन्या गॅरेजमध्येच आपल्या कामाला तिने सुरवात केली आहे. तर मुलीचे मनोबल वाढावे यासाठी तिच्या वडिलांनी देखील इतर कामगारांप्रमाणे धनश्रीला महिन्याकाठी 18 हजार रुपये इतका पगार द्यायला सुरुवात केली. धनश्री मागील चार महिन्यांपासून साकोली येथील आपल्या वडिलांच्या गॅरेजमध्ये काम करीत आहे .

कोरोनामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर कोरोनाच्या काळात शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळत नाही म्हणून निराश न होता. धनश्रीने स्वतः आत्मनिर्भर होण्यासाठी हे अनोखे पाऊल उचले आहे. याला कारण म्हणजे धनश्रीच्या वडिलांच्या रॅरेजमध्ये एकाच दिवशी नऊ ट्रॅक्टर रिपेरींग करता आले. मात्र, 12 कामगार असूनही कोरोनामुळे दोनच कामगार कामावर आल्याने धनश्रीचे वडील हतबल होत घरी बसले असताना तिच्या वडिलांनी तिला पाण्याचा भरलेला एक ग्लास मागितला आणि कामगार न आल्याने काय करायचे असे तिला विचारले असता धनश्रीने स्वतः काम करण्यास होकार दिला.

Navratri 2020 : साडेतीन शक्तीपीठांसह राज्यात अनेक मंदिरांमध्ये घटस्थापना; कोरोनामुळे भक्तांच्या आनंदावर विरजण

मग त्याच दिवशी सुरु झाला धनश्रीचा मॅकॅनिकल इंजिनियरचा खरा प्रवास. अनेकांनी तिला गॅरेजमध्ये काम करताना विचित्र प्रश्न विचारले. चांगलं शिक्षण असताना तू हात का काळे करतेस? पुरुषांची मक्तेदारी असलेले हे काम तु का करत आहेस. तसेच तिच्या वडिलांना देखील कोण ही मुलगी. तेव्हा तिच्या वडिलांनी ही माझी मुलगी असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगितले. तेव्हा तिने मी मॅकॅनिकल इंजिनियर आहे, असे सांगताच लोकांचे तोंड बंद झाले.

धनश्रीप्रमाणे तिचे वडील प्रेमलाल हाताझाडे हे सुद्धा उच्च शिक्षित असून त्यांचे साकोली येथे ट्रॅक्टर दुरुस्तीचे गॅरेज आहे. त्यांना दोन मुलीच असून त्यांनी त्यांच्यात कधी भेदभाव केला नाही. आपल्याप्रमाणे आपली मुलगी सुद्धा उच्च शिक्षित व्हावी असे त्यांचे स्वप्न होते. तर धनश्रीने ते करून दाखविले. मात्र, पदवी मिळाल्यानंतर इतर कुठे नोकरीच्या मागे न धावता वडिलांच्या गॅरेजमध्ये ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम शिकण्याचा निर्णय तिने घेतला.

Navratri 2020 | शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; पुण्यातील चतुश्रृंगी देवीच्या मंदिरात घटस्थापना

महत्त्वाच्या बातम्या

भुजबळ, मुश्रीफ सोडले तर बाकीच्या नेत्यांनी अजित दादांना त्रास दिला, हे दादांनीच मला सांगितलं; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
भुजबळ, मुश्रीफ सोडले तर बाकीच्या नेत्यांनी अजित दादांना त्रास दिला, हे दादांनीच मला सांगितलं; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
Supreme Court: एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
District Bank Election Result 2026 पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
Satara District Bank Election Result 2026: राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Embed widget