एक्स्प्लोर
माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टेंवर गोळीबार

पेण : रायगड जिल्ह्यातील पेण - खोपोली मार्गावरील सापोली गावानजीक हॉटेल बाहेर अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून मंगळवारी रात्रीच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. सुदैवाने अंगरक्षकाच्या सतर्कतेने अविनाश रामिष्टे या हल्ल्यातून बचावले आहेत . अविनाश बाबुराव रामिष्टे हे मंगळवारी रात्री नोगोठणे येथील कार्यक्रम आटोपून परतत असताना, पेण खोपोली मार्गावरील सापोली हद्दीतील हॉटेल योगीराज येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह जेवण करण्यासाठी थांबले होते. रात्री 10 च्या सुमारास जेवण आटोपून रामिष्टे हे त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीत बसत असताना मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात हल्ले खोरांनी जवळून गोळीबार केला. यावेळेस रामीष्ठे यांचे अंगरक्षकाने सतर्कता बाळगत अविनाश रामिष्टे यांना बाजूला केल्याने गोळी गाडीच्या काचेतून आरपार निघून गेली आणि सुदैवाने रामिष्टे या हल्ल्यात थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पेण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.
आणखी वाचा























