एक्स्प्लोर
सांगलीत भर दुपारी तरुणावर गोळीबार, सुदैवाने जीवितहानी नाही
सांगली : सांगलीतील कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात भर दुपारी गोळाबाराची घटना घडली. अक्षय सुरवसे या तरुणावर दुचाकीस्वारांनी गोळीबार केला. मात्र सुदैवाने तरुणाला कोणतीही इजा झाली नाही.
सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र घटनास्थळावरून गोळीबार झाल्याचा कोणताही पुरावा अथवा प्रत्यक्षदर्शी पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे हा गोळीबाराचा बनाव असल्याची दाट शक्यता असल्याचा पोलिसांना अंदाज आहे.
पोलीस या अनुषंगाने अक्षय सुरवसे या तरुणाकडून अधिक तपास करत आहेत. दोन गाड्यावरून आलेल्या 6 तरुणांमधील एका तरुणाने आपल्यावर गोळीबार करून पसार झाल्याचं अक्षय सुरवसेने सांगितलं आहे. अक्षय मूळचा पंढरपूरचा असून सांगलीत मामाकडे रहायला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement