एक्स्प्लोर
अहमदनगरमध्ये धावत्या रिक्षाला आग, तीन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू
अहमदनगरच्या नेवसा फाट्याजवळ एका सीएनजी रिक्षानं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अहमदनगर : अहमदनगरच्या नेवसा फाट्याजवळ एका सीएनजी रिक्षानं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. पेट घेतलेल्या रिक्षातील तीन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल (सोमवार) रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. मुळचे औरंगाबादचे असलेले रहिवासी चांदा गावात साखरपुड्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना ही घटना घडली.
या रिक्षातून एकूण पाच जण प्रवास करत होते. यामधील नमीरा शफीक कुरेशी आणि महेवीश आतीक कुरेशी आणि जुनेद शफीक कुरेशी या तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर समीर हनीफ कुरेशी, रफीक हाजी जाफर कुरेशी, हे यात गंभीर जखमी झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement