एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ईडीच्या भीतीपोटी शिवसेनेने भाजपसोबत युती केली, विखे पाटलांचा खळबळजनक आरोप
भाजपने ईडीची (सक्तवसूली संचालनालय) भीती घालून शिवसेनेला युती करायला भाग पाडलं आहे. असा खळबळजनक आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
पुणे : भाजपने ईडीची (सक्तवसूली संचालनालय) भीती घालून शिवसेनेला युती करायला भाग पाडलं आहे. असा खळबळजनक आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. आज पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत ते बोलत होते.
शिवसेना-भाजप युती होणार असल्याचे आज जवळपास निश्चित झाले. आज सायंकाळी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत अधिकृत घोषणा करतील. त्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह दुपारी साडेचारच्या सुमारास मुंबईत दाखल झाले आहेत. दोन्ही पक्षनेत्यांनी राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठका सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विखे पाटलांना हा खळबळजनक आरोप केला आहे.
VIDEO : पाहा, काय म्हणाले विखे पाटील
दरम्यान, अमित शाह मुंबईत दाखल झाले असून, सोफीटेल हॉटेलमध्ये शाह यांची भाजपच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला मातोश्रीवरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शिवसेना नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. शिवसेनेच्या बैठकीला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक बडे नेते उपस्थित आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement