एक्स्प्लोर
Advertisement
शेतकरी संपाआडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा दंग्याचा प्रयत्न: सदाभाऊ खोत
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ आता कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही शेतकरी संपावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
"शेतकरी संपाआडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा गोंधळ आणि दंगा घालण्याचा प्रयत्न सुरु आहे", असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
शेतकरी संपामुळे नाशिक, पुण्यात भाजीपाला आवक घटली आहे, मात्र मुंबईत काही परिणाम नाही, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.
शेतकऱ्याला माल द्यायचा असेल, अडचणी येत असतील तर त्यांनी पणन मंडळाशी संपर्क करावा, असं आवाहन त्यांनी केलं. त्यासाठी पणन मंडळाकडून 18002330244 हा टोल फ्री नंबर तयार करण्यात आला आहे. शेतकरी त्याच्यावर संपर्क साधू शकतात. शेतकऱ्याला शेतमाल द्यायचा असेल, काही अडचणी येत असतील तर ते संपर्क करू शकतील, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
भाजीपाला आणि दुधाव्यतिरिक्त इतर माल अडवून नासधूस होतेय. हे करणारे शेतकरी नाहीत. यात शेतकऱ्यांच्या आड काही मंडळी घुसली आहेत. ज्यांना 15 वर्ष काही करता आलं नाही ते संप चिघळवत आहेत, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
सनदशीर मार्गाने आंदोलन करताना ज्या शेतकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असतील त्याची चौकशी केली जाईल. या संपाचा गैरफायदा घेत कुणी चढा भाव, साठेबाजी करत असेल तर पणन मंडळ कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारला शेतकऱयांना न्याय द्यायचा आहे. दखल घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. मी आवाहन करतोय मुख्यमंत्र्यांनी चर्चेचं निमंत्रण दिलं आहे ते स्वीकारावं. संवाद, सामोपचाराने प्रश्न सोडवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. या आवाहानाला शेतकरी प्रतिसाद देतील, असा विश्वास खोत यांनी व्यक्त केला.
दंगा, गाड्यांची मोडतोड यांच्याशी शेतकऱ्यांचा संबंध नाही असं शेतकरी नेते सांगत आहेत. गोंधळ, दंगा करण्याचा प्रयत्न काँग्रेस- राष्ट्रवादी करत आहे. प्रश्न सुटावा ही माझी इच्छा आहे. सरकाराने गंभीर दखल घेतली आहे, असं त्यांनी नमूद केलं.
अल्पकर्जधारक शेलकाऱ्यांना दिलासा देण्याबाबत
आम्ही शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन करतोय, चर्चेतून शेतकऱ्यांच्या मागण्या कशा सुटतील आणि नुकसान कसं होणार नाही ही भूमिका सरकारने घेतलेली आहे. चर्चेला सुरुवात झाली की मागण्यांचा निश्चितपणाने विचार करुन सरकार योग्य त्या उपाययोजना करेल, असं सदाभाऊ म्हणाले.
अण्णा हजारेंचं स्वागत
जर अण्णा हजारे चर्चेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढे येत असतील तर मी सरकारमार्फत त्यांचे स्वागत करतो, असं सदाभाऊंनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बुलढाणा
भारत
महाराष्ट्र
Advertisement