एक्स्प्लोर

कडकनाथ कोंबडी घोटाळा, मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद

या फसवणूक प्रकरणी आत्तापर्यंत 1100 जणांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

सांगली : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि महा रयत ॲग्रो कंपनीचा संस्थापक सुधीर मोहिते आज न्यायालयात शरण आला आहे. मागील दोन महिन्यापासून मोहिते फरार होता. न्यायालयात शरण येताच पोलिसांनी त्याला अटक केली. महाराष्ट्र बरोबरच कर्नाटक, तेलंगणा, केरळ, गोवा यासह  हजारो शेतकऱ्यांना सुमारे 800 कोटींना महा रयत अँग्रो कंपनीने गंडा घातल्याची शक्यता आहे. याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी संस्थापक सुधीर मोहितेसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. यातील तिघांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य सुत्रधार सुधीर फरार होता. अटकपूर्व जामिनासाठी त्याने न्यायालयात अर्जही केला होता. या अर्जावर सुनावणी होण्याआधीच आज तो न्यायालयात शरण आला. कडकनाथ कोंबडी व्यवसायात गुंतवणूक केलेल्या हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी महारयत अॅग्रो कंपनीचा संस्थापक सुधीर मोहितेसह सहा जणांच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी संदीप मोहिते, हणमंत जगदाळे, गणेश शेवाळे यांना आधीच अटक करण्यात आली होती. या फसवणूक प्रकरणी आत्तापर्यंत 1100 जणांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात कडकनाथ कुक्कुटपालनाची शक्कल लढवित गुंतवणुकीची योजना सुरू केली होती.‘रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका’ असं या योजनेचे स्वरुप होतं. यात प्रोजेक्ट मालकास एकूण 75 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागायची. यातून शेतकर्‍याला एका वर्षात 2 लाख 30 हजार आणि 375 रुपयाप्रमाणे 120 पक्ष्यांच्या विक्रीतून 45 हजार असे पावणे तीन लाख देण्याचे आमिष दाखविले होते. 75 हजारांच्या बदल्यात वर्षभरात मोठा परतावा मिळत असल्याने तसेच दोन टप्प्पात रक्कम द्यायची असल्याने अनेक शेतकरी या योजनेला सहजासहजी बळी पडले आहेत. सुमारे 8 हजार शेतकर्‍यांचे सुमारे 300 ते 400 कोटी रुपये यात अडकले असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget