एक्स्प्लोर

Farmer suicide : धक्कादायक! परभणीत 24 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन, परतीच्या पावसानं सोयाबीनचं झालं होतं नुकसान

परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं (Soybean) नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी (Parbhani) जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली.

Farmer suicide : सध्या राज्यात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हाती आलेली पिकं या परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीनचं (Soybean) नुकसान आणि खासगी फायनान्सचं घेतलेलं कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून परभणी (Parbhani) जिल्ह्यातील कौसडी येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली. विषारी औषध घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. गुलाब जीवने (वय, 24 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

बीड पाठोपाठ परभणी जिल्ह्यातही एका तरुण शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं आहे. परतीच्या पावसानं झालेलं सोयाबीन पिकाचं नुकसान आणि खासगी फायनान्सचे घेतलेलं कर्ज कसं फेडायचे या विवंचनेतून गुलाब जीवने यांनी आत्महत्या केली आहे. तरुण शेतकरी गुलाब जीवने यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. या शेतात त्यांनी सोयाबीन लावले होते. मात्र, परतीच्या पावसाने हे सोयाबीन वाया गेले. त्यातच खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज डोक्यावर आणि नुकसान पाहता हे कर्ज फेडायचे कसे व आपला प्रपंच चालवायचा कसा या विवंचनेत गुलाब जीवने यांनी विषारी औषध प्राशन केले. या घटनेनंतर तत्काळ गावकऱ्यांनी त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार करुन त्यांना परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी गुलाब जीवने यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात लहान भाऊ आणि आई आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यानेही संपवलं जीवन

राज्यात परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातलं आहे. शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात राजेगाव येथील संतोष दौंड या हा शेतकरी देखील परतीच्या पावसामुळं नुकसान झाल्याने हतबल झाला होता. हाता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यानं या शेतकरी बांधवानं नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली होती. या घटनेवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ह्रदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. सत्तेची धुंदी आणि एकमेकांचा पक्ष संपवण्याच्या नादात व्यस्त असलेल्या राजकारणी आणि  सरकारला अन्नदात्या शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही. त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायलाच हवे असा इशारा तुपकरांनी दिली आहे. आमच्या शेतकरी दादाची ही आहुती वाया जाऊ देणार नाही. माझी भावपूर्ण श्रद्धांजली! असं तुपकर यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, शेती पिकांना मोठा फटका, आजही राज्यात पावसाची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Torres Scam : 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त
300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक गोष्टी, आरोपीच्या घरात 77 लाख सापडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar on Jayant Patil | पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांविरोधात झेंडा Special ReportPM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Torres Scam : 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त
300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक गोष्टी, आरोपीच्या घरात 77 लाख सापडले
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
Embed widget