एक्स्प्लोर
डीजे वाजवण्याचा वाद, पोलिसांची महिला, वृद्धांना अमानुष मारहाण
पोलिसांच्या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.

अमरावती : पोलिसांना लाच दिली नाही म्हणून मारहाण केल्याचा आरोप अमरावतीमधील तिवारी कुटुंबाने केला आहे. पोलिसांच्या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी महिलांनाही लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण केली. अमरावती शहरातील बिल्डर राजू तिवारी यांच्या मुलाचा 22 तारखेला वाढदिवस साजरा केला जात होता. त्यावेळी डीजे वाजवण्याच्या कारणावरुन वाद झाला. पोलिसांनी डीजे चालू देण्यासाठी लाच मागितली, ती दिली नाही म्हणून मारहाण करण्यात आली, असा आरोप तिवारी कुटुंबाने केली आहे. प्रकरण काहीही असो, पोलिसांना दंडात्मक कारवाई करता आली असती. मात्र असं न करता थेट पोलिसांनी अमानुष मारहाण केली. धक्कादायक म्हणजे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी 8 दिवसात कोणतीही कारवाई अद्याप केलेली नाही. त्यामुळे अमरावती पोलिसांच्या या दडपशाहीविरोधात शहरात संताप व्यक्त केला जात आहे. वृद्ध आणि महिलांनाही मारहाण पोलिसांनी मारहाण करताना वृद्ध असो किंवा महिला, कुणालाही सोडलं नाही. या मारहाणीमध्ये 8 जण गंभीर जखमी झाले होते. तर मनिष अहिरे यांचं 3 ठिकाणी हाड तुटलं आहे. तिवारी कुटुंबाने 23 ऑक्टोबरला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे तक्रारही दाखल केली. मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. या कुटुंबाने अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हे प्रकरण मीडियासमोर आल्यानंतर पोलिसांनी सारवासारव सुरु केली असल्याचं दिसत आहे. कारण या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच कारवाई करु, असं आश्वासन पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिलंय. धक्कादायक म्हणजे ज्या तिवारी कुटुंबाला मारहाण करण्यात आली, त्या तिवारी कुटुंबाचे प्रमुख राजू तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय त्यांच्या तडीपारीचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















