एक्स्प्लोर

मोठी बातमी! SIT प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई; वाल्मिक कराडच्या पत्नीने सांगितलं सुरेश धस कनेक्शन

Manjili Karad : बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. ते शीतल तेली यांचे पती असून त्या IAS अधिकारी आहेत. म्हणजे सुरेश धस यांचे ते जवळचे असल्याचे मंजिली कराड यांनी सांगितलं आहे.

Manjili Karad : संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची हत्येच्या तपासासाठी 1 जानेवारीला नेमलेली SIT रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी 7 जणांची नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेलीच हे नवीन एसआयटीचे प्रमुख आहेत. पण याबाबत वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. ते शीतल तेली यांचे पती असून त्या IAS अधिकारी आहेत. म्हणजे सुरेश धस यांचे ते जवळचे असल्याचे मंजिली कराड यांनी सांगितलं आहे. त्यामुळं SIT मधील आठही अधिकारी बदला अशी मागणी देखील त्यांनी केलीय. 

दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड यांना बळीचा बकरा केला जात आहे

संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर SIT ते वाल्मिक कराडला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली. बजरंग सोनवणे हे निवडून येण्यासाठी माझ्या पतीनं मदत केली असल्याचे त्या म्हणाल्या. दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड याला संपवणे गरजेचे असल्याने त्यांना बळीचा बकरा केला जात असल्याचे मंजिली कराड म्हणाल्या. SIT मधील आठही अधिकारी बदला. कोणाचेच नातेवाईक यामध्ये नसले पाहिजेत अशी मागणी मंजिली कराड यांनी केली आहे. माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करुन SIT चे लोकं काहीही करु शकतात असे त्या म्हणाल्या.

बजरंग सोनावणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली

संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले त्यावेळी माझे पती परळीमध्ये नव्हते. माझ्या पतीचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे मंजिली कराड म्हणाल्या. सरकार स्थापन झाले तेव्हा दोन मंत्री हे वंजारी आमच्या अल्पसंख्यांक समाजाचे झाले. हे मराठा समाजाच्या नेत्यांना पटलं नाही असे मंजिली कराड म्हणाल्या. सुरेश धस यांचं स्टेटमेंट आहे मी तुमची माती करेल. तसेच बजरंग सोनावणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही मंजिली कराड म्हणाल्या. 

सुरेश धस आणि बसवराज तेली यांचे CDR काढा

CDR काढण्याची हौस आहे ना तर सुरेश धस आणि बसवराज तेली यांचे CDR काढून बघा किती फोन झालेत कळतील असे मंजिली कराड म्हणाल्या. वंजारी समाज अल्पसंख्यांक असल्याने समाजाला दाबण्यासाठी हे सगळं सुरु आहे. गरीब समाज आणि लोकांना टार्गेट करू नका. ज्यांचा खून झाला त्यांचा आणि माझ्या नवऱ्याचा काहीही संबंध नसल्याचे मंजिली कराड म्हणाल्या. त्यांचा साधा एक फोनही झालेला नाही. त्यांची एकमकेंची ओळख देखील नाही असे मंजिली कराड म्हणाल्या. आमच्या नेत्याना संपवण्यासाठी सगळं सुरु असल्याचे कराड म्हणाले. 

उद्या आम्ही रस्त्यावर उतरु

आज जामीन झाली असती पण 302 मध्ये चौकशी करायची म्हटलं आहे.  302 चा आमचा काहीही संबंध नाही.  पण SIT म्हणते की आम्हाला चौकशी करायची आहे. 15 दिवस तुम्ही काय केलं? तेव्हा का चौकशी का केली नाही असा सवाल देखील मंजिली कराड यांनी केला. तुम्ही वेडेवाकडे फाटे फोडले तर आम्ही सहन करणार नाही. उद्या आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा मंजिली कराड यांनी दिला. आमचा मुख्यमंत्रीवर विश्वास आहे. त्यांच्याकडे आमचं मागणं आहे की, फक्त युतीमध्ये असल्याने टार्गेट केलं जात आहे.  तुम्ही तुमचं राजकारण बघा पण माझ्या नवऱ्याचा याच्याशी संबंध नाही असे मंजिली कराड म्हणाल्या. 

महत्वाच्या बातम्या:

Manjili Karad : वंजारी समाजाचे दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराडला बळीचा बकरा केला; कराडच्या पत्नीचा SIT, धस आणि बजरंग सोनवणेंवर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Embed widget