एक्स्प्लोर

Loan Apps Fraud: सावधान...! मोबाईल ॲप्सद्वारे कर्ज घेताय, आधी हे वाचा!

झटपट लोन देण्यासाठी अनेक अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर देखील आपण अशा अनेक जाहिराती पाहिल्या असतील. मात्र हे असले कर्ज घेणं म्हणजे आयुष्याशी खेळ ठरू शकतो. या पठाणी वसूलीविरोधात औरंगाबाद येथील काही तरुण पोलिसात गेले आहेत.

औरंगाबाद: सध्या झटपट लोन देण्यासाठी अनेक अॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर देखील आपण अशा अनेक जाहिराती पाहिल्या असतील. मात्र हे असले कर्ज घेणं म्हणजे आयुष्याशी खेळ ठरू शकतो. हे कर्ज तुमची समाजात अतोनात बदनामी करणारे ठरेल. या ॲप्स चालकांच्या जीवघेण्या वसूली विरोधात औरंगाबाद येथील काही तरुण पोलिसात गेले आहेत. त्यामुळं फक्त प्ले स्टोअरवरील अॅप्सवरुन फक्त आधार कार्डवर लोन देणाऱ्यांपासून सावधान राहाणं गरजेचं आहे.

प्ले स्टोअर उपलब्ध असणारे अॅप आपल्याला पाच ते आठ हजारापर्यंत कर्ज देते. फक्त आधारकार्डवर लोन, फक्त पॅन कार्डवर लोन, विना गॅरंटर लोन मिळत असल्याने औरंगाबादेतील अनेक तरुणांनी अशाप्रकारचं कर्ज घेतलं. पाच हजार रुपयांचं कर्ज घेतलं तर प्रोसेसिंग फीस आणि इतर चार्ज लावत या कंपन्या आपल्याला केवळ अडीच हजार रुपये हातात देतात. मात्र परतफेड करतेवेळी आपल्याला पाच हजार रुपयेच द्यावे लागतात. ते ही सात दिवसात द्यावे लागतात.

औरंगाबादेतील निशांत देशपांडे आणि संदीप कुळकर्णी या दोन तरूणांनी प्ले स्टोरवरून अॅप डाऊनलोड केले. या अॅपवरून प्रत्येकी 5 हजाराचे कर्ज घेतले. 10 दिवसांच्या अवधीत त्यांना ते फेडणं शक्य झालं नाही. वसूलीसाठी ससेमीरा सुरु झाला, धमकीचे फोन, शिवीगाळ देखील केली जाऊ लागली. अगदी सकाळी 6 वाजेपासून या अॅप्स चालवणाऱ्यांचा त्रास सुरु झाला.

संपर्कातील लोकांना जातो फ्रॉड असल्याचा मेसेज विशेष म्हणजे हे अॅप मोबाईलमध्ये घेतांना या अॅप्सकडून तुमची सगळी कॉन्टॅक्ट लिस्टही चोरली आहे. त्यामुळं तुम्ही कॉल घेतला नाही तर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये प्रत्येकाला तुम्ही फ्रॉड असल्याचा मॅसेज जातोय. फक्त मॅसेजेच नाही तर तुमच्या फोटोवर तुम्ही फ्रॉड असल्याचं सांगत ग्राफिक्स तयार करतात आणि तेही तुमच्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सना पाठवले जाते. वसूलीची ही नवी पद्धत चक्रावून टाकणारी आणि तितकीच धोकादायक सुद्धा आहे. पाच हजारांच्या वसूलीसाठी थेट हमरीतुमरीची भाषा केली जात आहे, शिवीगाळ आणि धमकी देखील दिली जात आहे.

वसूलीसाठी केली जातेय शिविगाळ वसुलीसाठी फोन करणार्‍या व्यक्तीला आपण महिलांशी बोलतोय का पुरुषांशी याचा देखील भान राहत नाही. औरंगाबाद येथे दिपाली मुंडे यांना तर चक्क शिविगाळ केल्याचा त्यांचा आरोप आहे. हे ॲप्स डाऊनलोड करताना आपल्याकडून कॉन्टॅक्ट आणि मेसेंजरची परवानगी घेतात. त्यामुळे आपले कॉन्टॅक्ट या कंपन्यांकडे असतात. आपल्या मोबाईल मधील नातेवाईकांचे कॉन्टॅक्ट घेऊन त्यांना देखील आपण गॅरेंटर असल्याचं सांगत त्यांनाही त्रास दिला जातो.

त्रासलेले युवक पोलिसांकडे याबाबत या सगळ्या युवकांनी एकत्र येत पोलिसांकडेही धाव घेतली. पोलिसांनी ऐकून घेत चाचपणी सुरु केली आहे. मात्र असे अनेक अॅप ज्यातून अशा पद्धतीची लूट सुरु आहे, हे गंभीर आहे. थोड्या पैशांसाठी तरूणाई या जाळ्यात अडकत चालली आहे. दुर्दैवानं या कर्ज देणाऱ्या या अॅपवर कुठलेही बंधन दिसत नाहीये. लोन घेतलं की जीवाचा त्रास अटळं असा हा प्रकार सुरू आहे. त्यामुळं पोलिसांनी सुद्धा अशा अॅपवर कारवाई करण्याची गरज आहे तर तरूणांनी सुद्धा झटपट कर्जाच्या मोहापासून दूर राहण्याची गरज आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget