महानगरपालिका,नगरपरिषद उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
Local Body Election : महानगरपालिका,नगरपरिषद उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला
Caste Validity Certificate for Election : ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत. आरक्षित प्रवर्गातून जे उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांनी अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महानगरपालिका,नगरपरिषद उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा अध्यादेश काढण्यात येणार आहे.
राज्यात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर 2022 अथवा त्यापूर्वीचा असणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ज्या व्यक्तीने आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल मात्र, अर्ज दाखल करण्याच्या वेळेस त्या व्यक्तीस जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नसले अशा उमेदवाराला निवडणुकीत विजय मिळाल्यास 12 महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करणार असल्याची हमी द्यावी लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास निवड रद्द करण्यात यावी या तरतुदीला देखील मंत्रिमंडळाच्या बैठकी मंजुरी देण्यात आली.
झेडपी, पंचायत समितीमध्येही जागा वाढणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महानगरपालिकाप्रमाणेच लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जागा वाढवण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये साधारणपणे सहा ते सात टक्के जागा वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणाऱ्या इच्छुकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Omicron Variant : राज्यात शाळा सुरू होणार का?; विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांमध्ये संभ्रम
ओमिक्रॉनसंदर्भात नियमावलीबाबत पंतप्रधानांशी चर्चा करुन निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीतील सूर
ओमिक्रॉनचा धोका, मुंबईत अलर्ट; व्हायरसला रोखण्यासाठी महापालिका सज्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha