Rajendra Raut : त्यांनी मला हक्कानं मारलं, विरोधकांकडून आमदार राऊतांना बदनाम करण्याचा प्रयत्न, 'त्या' व्हीडिओबद्दल कार्यकर्त्याचं स्पष्टीकरण
आमदार राजेंद्र राऊत यांनी अधिकारवाणीनं आपणास मारल्याची माहिती कार्यकर्त्यानं दिली आहे. त्यांचा तो हक्कच असल्याचेही कार्यकर्त्याने सांगितले.
Rajendra Raut : आमदार राजेंद्र राऊत यांना बदनाम करण्यासाठी, विरोधकांनी प्रसारमाध्यमांना कथीत व्हीडिओबद्दल खोटी माहिती दिली आहे. घटनेची सत्य पडताळणी न करता आमदार राजेंद्र राऊत यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राऊत यांनी अधिकारवाणीनं आपणास मारल्याची माहिती कार्यकर्त्यानं दिली आहे. त्यांनी मला हक्काने मारले, त्यांचा तो हक्कच असल्याचेही त्यांनी सांगितले. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पाया पडायला स्टेजवर आलेल्या कार्यकर्त्याला एका सार्वजनिक कार्यक्रमात सर्वांसमोर कानशिलात लगावली होती. राऊत यांनी केलेल्या या मारहाणीची व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर मारहाण झालेल्या कार्यकर्त्यानं स्पष्टीकरण दिलं आहे.
सदरच्या घटनेबाबत हकीकत अशी आहे की, व्हीडिओमधील व्यक्ती ही आमदार राजाभाऊ राऊत यांच्या भावाच्या खडी क्रशरवरील कामगार आहे. तो दारु पिऊन कार्यक्रमस्थळी स्टेजवर आला होता. यावेळी मैदानावर गर्दी असल्यानं दारुच्या नशेत त्याच्याकडून चुकीचं कृत्य घडू नये म्हणून, आमदार राऊत यांनी त्या कामगारास चापट मारली होती. त्यांनी आपल्या अधिकारवाणीने आपल्याला मारल्याचे स्पष्टीकरनं कामगारानं दिलं आहे. पण आमच्या विरोधकांनी तेवढाच व्हिडिओ व्हायरल करुन प्रसार माध्यमांना चुकीची माहिती दिली आहे. प्रसार माध्यमांनीही घटनेची सत्य पडताळणी न करता आमदार राजेंद्र राऊत यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती कामगारानं दिली आहे.
दारु पिऊन कार्यक्रमस्थळी आलेला कामगार - राजेंद्र राऊत
चुकीचं कृत्य घडू नये म्हणून मारहाण
स्टेजवर मी त्यांच्या पाया पडायला गेल्यावर तू दारु पिला आहेस का? असे आमदार राऊत यांनी मला विचारले. मी दारु पिल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी मला चापट मारली. दारु पिल्यामुळं माझ्या हातून चुकीचे कृत्य घडू नये म्हणून त्यांनी मारले. त्यांनी मला हक्काने मारले, त्यांचा तो हक्कच असल्याचं कामगारानं सांगितले. आम्ही व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून त्यांनी हक्काने मारले. त्यांचा माझ्यावर हक्क असल्याचे कामगाराने सांगितले. तसेच आमदार राऊत यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करत असल्याचेही कामगाराने सांगितले.
आमदार राजेंद्र राऊतांची भरस्टेजवर मारहाण, पाया पडायला आला आणि मार खाऊन गेला
नेमकं प्रकरण काय
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पाया पडायला आलेल्या कार्यकर्त्याला एका सार्वजनिक कार्यक्रमात भरस्टेजवर सर्वांसमोर कानशिलात लगावली होती. राऊत यांनी केलेल्या या मारहाणीची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान,0 पाया पडायला आलेला तरुण हा दारु पिऊन कार्यक्रमस्थळी स्टेजवर आला होता. म्हणून मारल्याचे स्पष्टीकरण राजेंद्र राऊत यांनी दिलं आहे. व्हीडिओमधील व्यक्ती ही आमदार राजाभाऊ राऊत यांच्या बंधू विजय राऊत यांच्या खडी क्रशरवरील कामगार आहेत. ते दारु पिऊन कार्यक्रमस्थळी स्टेजवर आले होते. यावेळी मैदानावर गर्दी असल्याने दारुच्या नशेत त्यांच्याकडून चुकीचं कृत्य घडू नये म्हणून, आमदार राऊत यांनी त्या कामगारास चापट मारली होती.