Loudspeaker Controversy : सध्या भोंगा या विषयावरून संपूर्ण राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले असताना अभ्यासक अब्दुल कादिर मुकादम यांनी अजानसाठी पर्याय सुचवला आहे. हा पर्याय कोणता असेल? या संदर्भात 'एबीपी माझा'च्या बातमीची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. दरम्यान, मुकादम यांच्या पर्यायाचं गृहमंत्र्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. भोंग्याच्या प्रश्नांवर कायम स्वरूपी उपाय सुचवणाऱ्या इस्लाम धर्माचे अभ्यासक अब्दुल कादिर मुकादम यांच्याशी संपर्क साधणार असल्याचं गृहमंत्री म्हणाले. अभ्यासक अब्दुल कादिर मुकादम यांनी नेमका कोणता पर्याय सुचवला आहे. जाणून घ्या


अशाप्रकारे अजान द्यायची गरज नाही, मुकादम यांचे मत
भोंगा या विषयावरून मुस्लिम विचारवंत आणि इस्लाम धर्माचे अभ्यासक अब्दुल कादिर मुकादम एक वेगळाच विचार मांडत आहेत. मशिदी वरील भोंगे हे 70 च्या दशकानंतर सुरू झाले असून, ज्यावेळेस इस्लामचा जन्म झाला, तेव्हापासून कधीच लाऊडस्पीकरवर अजान दिली गेली नव्हती. त्यामुळे आता देखील अशाप्रकारे अजान द्यायची गरज नाही, असे मत मुकादम व्यक्त करतात. यासाठी ते इतिहासातील दाखले देखील देतात. याहीपेक्षा ध्वनि प्रदूषण न करता अझाण देता येऊ शकते, असा एक किफायतशीर आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त असा मार्ग देखील त्यांनी शोधला आहे. त्यासाठी त्यांना समाजासोबत राजकीय पाठिंबा देखील लागणार आहे. हा उपाय कोणता आणि ज्यामुळे भोंग्ययांवरून राजकारण होणार नाही हे एबीपी माझाने जाणून घेतले आहे


अभ्यासक अब्दुल कादिर मुकादम यांनी अजानसाठी काय सुचवला पर्याय?
अब्दुल मुकादम यांनी मुस्लिम बांधवांना अजानसाठी लोकल रेडिओ स्टेशनचा पर्याय सुचवला आहे. लोकल रेडिओच्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना घरीच नमाज पठण करता येणार असल्याचं मुकादम म्हणाले. दरम्यान, लोकल रेडिओ स्टेशनच्या पर्यायाचं गृहमंत्र्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:  


Raj Thackeray : राज ठाकरे यांना अटक होणार? सांगली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी


धार्मिक स्थळांनी शेगावच्या मंदिराचा घ्यावा आदर्श; परवानगी असूनही कमी आवाज होते आरती


Shirdi : शिर्डीत साईंची काकड आरती, शेजारती होणार लाऊडस्पीकर विना; सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत परवानगी, भक्तांमध्ये नाराजी 



विठ्ठल मंदिराला राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा फटका, मंदिर प्रशासन पोलिसांकडून भोंग्याची परवानगी घेणार