एक्स्प्लोर
हत्येप्रकरणी माजी 'महाराष्ट्र केसरी' दत्तात्रय गायकवाड यांना अटक
पुणे : माजी 'महाराष्ट्र केसरी' दत्तात्रय गायकवाड यांना हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आज सकाळी साडेसात वाजता पुण्याजवळील वडकी गावात शिवाजी गायकवाड यांची जमिनीच्या वादातुन हत्या झाली. शिवाजी गायकवाड यांचा मुलगा अजिंक्य गायकवाड याने पोलिसांना दीलेल्या फिर्यादीनंतर ज्या आरोपींना अटक करण्यात आली, त्यामध्ये दत्तात्रय गायकवाड यांचा समावेश आहे.
दत्तात्रय गायकवाड हे 2003 चे 'महाराष्ट्र केसरी' आहेत. फेब्रुवारी 2015 मध्ये झालेल्या जमिनीच्या वादातून वाढत गेलेल्या पूर्ववैमनस्यातून वडकी (ता. हवेली) येथील शिवाजी गायकवाड यांचा खून झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी गायकवाड आणि आरोपी यांच्यात फेब्रुवारी 2015 मध्ये जमिनीचा वाद झाला होता. याचा राग मनात धरून आज सकाळी वडकी गावच्या हद्दीमध्ये साडेसात वाजण्याच्या सुमारास शिवाजी गायकवाड हे आपल्या दुचाकीवरून कामासाठी हडपसर येथील सिरम कंपनीत निघाले होते.
यावेळी रस्त्यात काही जण वडिलांना मारहाण करताना अजिंक्यला दिसले. वडिलांना सोडविण्यासाठी आलास तर जीवे मारण्याची धमकी अजिंक्यला आरोपींकडून देण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या अजिंक्यने इतरांच्या सोबतीने वडिलांना सोडवण्याचा प्रयत्न केला.
मात्र तोपर्यंत हल्ला करणारे सर्व जण फरार झाले होते. जखमी अवस्थेतील शिवाजी गायकवाड यांना हडपसर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement