एक्स्प्लोर
ईव्हीएम गुजरातहून सांगलीत, खोटा मेसेज पसरवणाऱ्यावर गुन्हा
सांगली महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात चालू आहे. मात्र यामध्ये सोशल मीडियावरुन गैरसमज निर्माण होईल, असे मेसेजही पसरवण्यात येत आहेत.
सांगली : मतदानासाठी ईव्हीएम गुजरातवरुन सांगलीत दाखल, असा मेसेज व्हॉट्सअॅपवर टाकणाऱ्या युझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
सांगली महापालिका निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात चालू आहे. या प्रचारात सोशल मीडियाचा मोठ्या खुबीने वापर केला जातोय. मात्र यातच काही गैरप्रकारही समोर येत आहे. मात्र प्रशासनाकडून यावर नजर ठेवली जात आहे.
व्हॉट्सअॅपवर खोटा मेसेज टाकल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसात एकाविरुद्ध तक्रार दिली गेली. मिरजेतील एका व्हाट्सअॅप ग्रुपवर महापालिका निवडणुकीसाठी गुजरातमधूज ईव्हीएम यंत्र आल्याची पोस्ट टाकण्यात आली.
निवडणूक कालावधीत अशा प्रकारे निवडणूक यंत्रणाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, या हेतूने अपप्रचार करणाऱ्यांवर कडक कारवाई कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
सांगली महापालिका निवडणुकीसाठी एक ऑगस्ट रोजी मतदान होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement