मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Pratapgad Fort Development Authority : महाराष्ट्र सरकारनं आज मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना केली आहे.
Pratapgad Fort Development Authority : महाराष्ट्र सरकारनं आज मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना केली आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापना करण्यात आली आहे. तसेच प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणावर सह-अध्यक्ष म्हणून साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून विजय नायडू यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा अधिकृत निर्णय जारी करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात असलेल्या प्रतापगडाच्या विकासासाठी हे प्राधिकरण स्थापन करण्यात आली आहे. प्रतापगड किल्लाचे बांधकाम 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावरुन करण्यात आले होते. 10 नोव्हेंबर 1659 रोजी याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार अफजलखानाचा वध केला होता. ही एक इतिहासातील मोठी घटना आहे. अशा या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ल्याच्या विकासासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले आहे.
पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून आदेश जारी
दरम्यान, प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद हे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यात आलं आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या प्राधिकरणासंदर्भात शासन आदेश जारी केला असून यामध्ये प्राधिकरणातील सदस्यांची माहिती देण्यात आली आहे. या प्राधिकरणामध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त साताऱ्याचे जिल्हाधिकारी,पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रादेशिक संचालक, पुणे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक यांचा समावेश असेल.
महत्वाच्या बातम्या: