एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मृत्यूनंतर घड्याळही थांबलं, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील भीषण अपघात
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या अर्टिगा कारच्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. अपघाताच्या अकरा मिनिटांनी म्हणजेच 2 वाजून 56 मिनिटं आणि 55 सेकंदानी एका महिलेचा घड्याळ बंद पडल्याचं दिसलं.
![मृत्यूनंतर घड्याळही थांबलं, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील भीषण अपघात Ertiga Car accident on Pune Mumbai Express way, Wrist Watch of Lady stopped मृत्यूनंतर घड्याळही थांबलं, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील भीषण अपघात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/10100348/Pimpri-Accident.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी चिंचवड : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात चौघांवर मृत्यूची वेळ आली होती. आश्चर्यकारक म्हणजे कारमधील एका महिलेचं घड्याळही तिच्या मृ्त्यूनंतर अगदी काही मिनिटांतच बंद पडलं.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली अर्टिगा कार बोरघाटात पोहचली होती. तीव्र उतार असल्याने चालकाचा अचानक ताबा सुटला आणि पुढे धावणाऱ्या ट्रकला गाडी मागून धडकली.
दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी झालेल्या या भीषण अपघातात सर्व प्रवासी अत्याव्यस्त पडले होते. अपघातग्रस्तांना मदत पोहचेपर्यंत तिघांचा जागीच मृत्यू झाला होता, दोघे गंभीर जखमी होते, तर एकाला किरकोळ इजा झाली होती.
VIDEO | नाशिकमध्ये विद्यार्थ्याला शिक्षिकेची बेदम मारहाण
अपघाताच्या अकरा मिनिटांनी म्हणजेच 2 वाजून 56 मिनिटं आणि 55 सेकंदानी एका महिलेचा घड्याळ बंद पडल्याचं दिसलं. हे पाहून सर्वच अचंबित झाले. उपस्थितांच्या मनात हे कसं घडलं असेल? हा प्रश्न उभा ठाकला. पण हा प्रश्न बाजूला ठेवून, बचावकार्य पार पाडण्यात आलं.
ज्या महिलेच्या हातावरील घड्याळ बंद पडलं, ती होती अंबरनाथची जानकी नाणेकर. याशिवाय अहमदनगर येथील सुष्मित मुथा, गुजरातच्या मोक्षा बाबूलाल शहा आणि मध्यप्रदेशमधील राणी गौर यांनी प्राण गमावले, तर अर्टीगा गाडीचा चालक बचावला.
![मृत्यूनंतर घड्याळही थांबलं, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील भीषण अपघात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/10100540/Pimpri-Ertiga-Car-Accident.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)