एक्स्प्लोर
Advertisement
15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी 69% मतदान
मुंबई : तुरळक घटना वगळता 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समितीमध्ये शांततेत मतदान पार पडलं. राज्यात सरासरी 69 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
राज्यातील 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समितीसाठी मतदान झालं. पहिल्या टप्प्यात जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. राज्यभरातील 15 जिल्हा परिषदांच्या 855 जागांसाठी तर 156 पंचायत समित्यांच्या 1712 जागांसाठी मतदान झालं.
प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय मतदान :
LIVE UPDATES :
- औरंगाबाद- 66.22 %
- बीड- 68.73 %
- हिंगोली- 72.49 %
- जालना- 74.80 %
- लातूर- 70.31 %
- नांदेड- 71.69 %
- उस्मानाबाद- 71.94 %
- परभणी- 74.94 %
- अहमदनगर- 70.83 %
- जळगाव- 64.14 %
- वर्धा- 64.93 %
- यवतमाळ- 70 %
- बुलडाणा- 67.31 %
- चंद्रपूर- 71.75 %
- गडचिरोली- 71.45 %
- एकूण सरासरी- 69
जिल्हा परिषद : मतदान आणि निकालाची तारीख
जिल्हा परिषद | मतदानाची तारीख | निकालाची तारीख |
रायगड | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
रत्नागिरी | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
सिंधुदुर्ग | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
पुणे | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
सातारा | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
सांगली | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
सोलापूर | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
कोल्हापूर | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
www.abpmajha.in | ||
नाशिक | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
जळगाव | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
अहमदनगर | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
अमरावती | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
बुलडाणा | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
यवतमाळ | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
औरंगाबाद | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
जालना | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
परभणी | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
हिंगोली | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
बीड | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
नांदेड | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
उस्मानाबाद | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
www.abpmajha.in | ||
लातूर | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
नागपूर | —– | —– |
वर्धा | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
चंद्रपूर | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
गडचिरोली | 16 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
- परभणी जिल्ह्यात दुपारी 3.30 पर्यंत 56.94 % मतदान
- बीड जिल्ह्यात दुपारी 3.30 पर्यंत 50.73 % मतदान
- हिंगोली दुपारी 3.30 पर्यंत 54.50% मतदान
- नांदेड दुपारी 3.30 पर्यंत 42% मतदान
- दुपारी 1.30 पर्यंत झालेले मतदान : एकूण 10 लाख 36 हजार 436 मतदारापैकी 4 लाख 18 हजार 128 मतदारांनी हक्क बजावला.
- उस्मानाबादमधील तालुकानिहाय आकडेवारी 38.29, तुळजापूर 42.98, कळंब 38.74, वाशी 40.55, भूम 42.76, परंडा 39.66, लोहारा 40.39, उमरगा 40.95, सरासरी 40.34%
- औरंगाबाद दीड वाजेपर्यंत 34.19 टक्के मतदान
- परभणी दीड वाजेपर्यंत 46.50 टक्के मतदान
- चंद्रपूर जिल्ह्यात दीड वाजेपर्यंत 39.33 % मतदान
- यवतमाळ- जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदान केंद्राबाहेर भाजप- शिवसेना कार्यकर्त्या मध्ये मारहाण दिग्रस तालुक्यातील सिंगद मांडावा गटात कळसा गावात भाजपचे उमेदवार बाबूसिंग राठोड यांनी केली राहुल शिंदे याला मारहाण दिग्रस पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल
- यवतमाळ जिल्ह्यात दुपारी 1.30 पर्यत 37.56 टक्के मतदान
- बुलडाणा जिल्ह्यात दीड वाजेपर्यंत 34.14टक्के मतदान
- बुलडाण्यात साडे अकरा पर्यंत 19.96 टक्के मतदान
- गडचिरोलीत साडेसात ते साडेनऊ वाजे पर्यंत 12.23% मतदान
- यवतमाळ जिल्ह्यात सकाळी साडे अकरा पर्यंत 21.29 % टक्के मतदान
- वर्धा 9 30 ते 12 पर्यंत 14 टक्के मतदान
- उस्मानाबाद लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी गावातील नागरिकांचा स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार 11 वाजेपर्यंत एकही मतदान नाही सकाळी 9.30 वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यात 10.45 टक्के मतदान सकाळी 9 .30 वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यात 9.50 टक्के मतदान सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत उस्मानाबादेत 10.10 % मतदान
- औरंगाबाद जिल्ह्यात सकाळपासून 4 ठिकाणी वोटिंग मशीन काही काळासाठी बंद, तर निवडणूक विभागाकडून मशिन बदलल्या.
- सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत बीड जिल्ह्यात 7.66 टक्के मतदान
- चितेगाव (ता .पैठण) येथील मतदान केंद्र क्र.169/244 मध्ये पाच खोल्यांपैकी एक बुथ पन्नास मिनिटे बंद. मशिन मध्ये बिघाड
- गडचिरोली- पहिल्या टप्प्यातील 8 तालुक्यात सर्वच केंद्रांवर मतदानाला सुरुवात, नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ठेवण्यात आली आहे
- उस्मानाबादमध्ये कळंब तालुक्यातील खोंदला आणि तुळजापूरच्या धनेगाव या गावांचा मतदानावर बहिष्कार. 9 वाजेपर्यंत एकही मतदान झाले नाही. विकास काम झाली नसल्यानं बहिष्कार
- 10 वाजेपर्यंत बुलढाणा जिल्हा टक्के वारी मतदान 7.69%
- गेवराई तालुक्यातील पांढरी आणि शेकटा या गावातील लोकांनी टाकला मतदानावर बहिष्कार. पाणी आणि रस्त्याच्या प्रश्नावरून मतदार झाले आक्रमक.
- लातूर- माजी आमदार दिलीपराव देशमुख धीरज देशमुख, वैशालीताई देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या पत्नी यांनी आज बाभुळगाव येथे मतदान केलं.
- अहमदनगरला पांगरमल दारुकांड प्रकरणी पांगरमलच्या गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार, मतदान केंद्रावर शुकशुकाट, मृताच्या नातेवाईकांना 15 लाख तर अत्यवस्थांना दहा लाखाची आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी यांना गावकऱ्यांनी निवेदन दिलं होतं. मात्र मागण्यांवर काहीच दखल न घेतल्यानं गावकऱ्यांचा बहिष्कार, दरम्यान पालकमंत्री राम शिंदे संध्याकाळी पांगरमलला भेट देणार
- वर्धा पहिल्या दोन तासात 7 टक्के मतदान यवतमाळ जिल्ह्यात सकाळी 9.30 पर्यत 10 टक्के मतदान चंद्रपूर सकाळी 9.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 10% बुलढाणा जिल्ह्याची 10 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी 7.69%
- नांदेडमध्ये उमरी तालुक्यातील 5 गावांचा मतदानावर बहिष्कार, बोथी, तुराटी, मोखंडी, सावरगाव, बितनाळ या गावातील लोकांचा मतदानावर बहिष्कार रस्त्याच्या मागणीसाठी 5 गावांचा मतदानावर बहिष्कार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement