एक्स्प्लोर

तब्बल नऊ कोटींचा मंडप अन् 60 लाखांचे बॅनर्स, निवडणुकीतील खर्चाची चौकशी होणार

बीड लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात निवडणूक विभागाकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. या खर्चाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

बीड : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात निवडणूक विभागाकडून झालेल्या खर्चाची रक्कम ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या मंडपाचं बिल दहापटीने वाढलं असून हे बिल तब्बल नऊ कोटी रुपये आहे. तर मतदारांच्या जनजागृती पत्रकांच्या प्रिंटींगचा खर्च 60 लाख रुपये करण्यात आला आहे. या प्रकरणी निवडणूक विभागाकडून झालेल्या खर्चाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे पत्र अवर सचिव आणि उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिलंय. भ्रष्टाचार जनांदोलनाचे विश्वस्त अॅडव्होकेट अजित देशमुख यांनी अवर सचिव शोभा बोरकर यांच्याकडे या संदर्भामध्ये तक्रार केली होती. यावरुन औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीतील प्रशिक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये जेमतेम दहा ते बारा दिवसाचा मंडप लावण्यात आला होता. त्याचे बिल नऊ कोटी रुपयांच्या घरात गेलं आहे, अशी माहिती अजित देशमुख यांनी दिली आहे. केवळ मंडपातच नाही तर निवडणुकीदरम्यान जे काही होर्डींग जिल्ह्यामध्ये लावण्यात आले होते. सोबत पॅम्पलेट छापण्यात आले होते, याचाही खर्च 60 लाख रुपये झाला आहे. आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे. आणखी निवडणूक विभागातील खर्चामध्ये कुठे वाढ झाली आहे का? त्याचीही माहिती मागवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक विभागाकडून घोटाळा? निवडणुकीदरम्यान कर्माचाऱ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी मंडप, होर्डींग, पॅम्पलेटसह अनेक साहित्यांची गरज असते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशीही निवडणूक केंद्रांवर अनेक साहित्यांची आवश्यकता असते. यासाठी प्रत्येक मतदारसंघानुसार विशिष्ट रक्कम दिली जाते. मात्र, बीड जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण, फक्त मंडपाचा खर्च 9 कोटी रुपये झाला आहे. तर, पॅम्पलेटचा खर्च 60 लाख रुपये झाला आहे. संबंधित बातम्या - Dhananjay Munde | धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भगवानगडावर | बीड | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Kailas Patil: चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू; नगरसेवकांच्या फुटीनंतर आमदार कैलास पाटलांचा थेट इशारा
चुकांमधून धडा घेऊ, जे चुकले त्यांना धडा शिकवू; शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवक फुटीनंतर आमदार कैलास पाटलांचा थेट इशारा
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Mumbai BMC : मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget