एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रावसाहेब दानवेंना निवडणूक आयोगाची नोटीस
औरंगाबाद : आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पैठणमधील सभेतील वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने पैठणमधील वक्तव्याप्रकरणी रावसाहेब दानवेंना नोटीस पाठवली आहे.
पैठणमधील प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. "मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा.", असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं.
नगरपालिका निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पैठणमध्ये रावसाहेब दानवे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची सभा झाली. त्यावेळी दानवे बोलत होते.
यापूर्वी दानवेंनी डोंबिवलीत अशाच पद्धतीने वक्तव्य केलं होतं. ‘शहरात राहणारे मतदार शिवसेनेला मतदान करतात आणि परत गावाला जाऊन भाजपलाही मतदान करतात,” असं दानवे म्हणाले होते.
दरम्यान, निवडणूक आयोगाने आता दानवेंना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे दानवे निवडणूक आयोगाच्या नोटिशीला काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
VIDEO :मतदानापूर्वी घरात येणाऱ्या लक्ष्मीचा स्वीकार करा: रावसाहेब दानवे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement