एकनाथ शिंदेंच्या वरळीतील सभेत रिकाम्या खुर्च्या? व्हिडीओ शेअर करत विरोधकांनी साधला निशाणा
Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली.
Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या निवडणुकीच्या आव्हानावर जाहीर सभेत प्रत्युत्तर दिले. मी छोटे मोठे आव्हान स्वीकारत नाही,मला जे आव्हान स्वीकारायचं ते सहा महिन्यापूर्वी पूर्ण केलं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या वरळीतील सभेवर विरोधकांनी टीकास्त्र सोडलेय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी वरळीतील सभेत लोकं उपस्थित नव्हते, खुर्च्या रिकाम्या होत्या... मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना अनेकांनी काढता पाय घेतला, असा आरोप विरोधकांनी केलाय. संजय राऊत, अमोल मिटकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्वीट करत टीकास्त्र सोडलेय. 32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय, असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलेय.
संजय राऊत काय म्हणाले ?
वरळीत मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला. कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय. 32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना? असं ट्वीट संजय राऊत यांनी केलेय. एवढे भले मोठे मैदान अर्धे (रिकामे) कसे झाले? असे ट्वीट सचिन अहिर यांनी केलेय. त्याशिवाय शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यावरुन टीकास्त्र सोडलेय. अनेक नेटकऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 33 देशांनी दखल घेतलेल्या मुख्यमंत्र्यांचे वरळीत रिकाम्या खुर्च्यांना संबोधन, असे ट्वीट एका नेटकऱ्यानं केलेय.
मुख्यमंत्र्यांच भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. @वरळी
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 7, 2023
कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला..
कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय..
32 वर्षाचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना? pic.twitter.com/FoYvWFVTIn
एवढे भले मोठे मैदान अर्धे (रिकामे) कसे झाले???🙄 pic.twitter.com/HFaXYSFZaN
— Sachin Ahir (@AhirsachinAhir) February 7, 2023
अमोल मिटकरी काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या लोकप्रिय सरकारच्या कार्यकाळात झपाट्याने होत असलेल्या विकासानंतर शिंदे फडणवीस सरकारची वरळी मतदारसंघातील ऐतिहासिक सभा.. #ये तो सिर्फ झांकी हैं मनपा विधानसभा पिक्चर अभी बाकी है.. असं म्हणत अमोल मिटकरी यांनी सभेच्या ठिकाणाचे काही फोटो अन् व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
महाराष्ट्राच्या लोकप्रिय सरकारच्या कार्यकाळात झपाट्याने होत असलेल्या विकासानंतर शिंदे फडणवीस सरकारची वरळी मतदारसंघातील ऐतिहासिक सभा.. #ये तो सिर्फ झांकी हैं मनपा विधानसभा पिक्चर अभी बाकी है pic.twitter.com/HS1L166QH2
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 7, 2023
वरळीतील गद्दारांची सभा... हीच गद्दारांची लायकी! भाजप प्रणित शिंदे टोळीच्या सभेला नागरिकांनी फिरवली पाठ! सभेत खुर्च्या खाली.. खुर्च्या काढायला पण कार्यकर्ते नाहीत 🤣 काँट्रॅक्टरला खुर्च्या काढायची सूचना... @AUThackeray pic.twitter.com/mirONU9PGn
— #शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya (@AnaghaAcharya) February 7, 2023
#भाजपप्रणित शिंदे सेनेच्या वरळीच्या सभेला नागरिकांनी फीरवली पाठा सभेत खुर्च्या खाली.
— Ganesh Wagh (@ganeshwagh4400) February 7, 2023
खुर्च्या कमी करण्याची कार्यकर्त्यांवर आली वेळ शिंदे सह भाजप च्या कार्यकर्त्यांनी देखिल फिरवली पाठ@AUThackeray ji@SardesaiVarun ji@DurgeSainath ji@pravinpatkar2 ji@PawanJadhav05 ji pic.twitter.com/dItTVopy98
श्री. एकनाथ शिंदे यांची आजची वरळी येथील सभा, शिंदेंना आतातरी कळून चुकलं असेल कि पैसे अन सत्तेच्या दडपशाहीच्या जोरावर पदाधिकारी स्वतःकडे घेताल, पण सच्चा शिवसैनिक हा तुमच्याकडे नाहीये, मुंबईचा मूड यातून ओळखता येईल... pic.twitter.com/K6I51FKhqD
— Vaibhav Kokat (@ivaibhavk) February 7, 2023
#वरळी
— Ajay Mane (@ajaymane2995) February 7, 2023
आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या चॅलेंज ला, एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या स्वीकारले. पण शक्ति प्रदर्शनाचा डाव फसला का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला रिकाम्या खुर्च्या तर दिसल्या पण सभा सुरु असताना माणस उठून जाताना ही दिसलेत.#आदित्यठाकरे vs #एकनाथशिंदे pic.twitter.com/sowgCnha5j