(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : शिंदें गटाचं चिन्ह ठरलं ? धनुष्यबाण गोठवल्यास ' हे ' असू शकतं शिंदे गटाचे चिन्ह
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का दिला तो म्हणजे थेट पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा ठोकला . पक्षाचं अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठी दोन्हीं गट लढाई लढत आहेl.
Eknath Shinde : धनुष्यबाण चिन्ह कुणाचे? याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच दिलाय. धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांचे प्रयत्न सुरू आहेत. माञ कायदेशीर पेचप्रसंगात धनुष्यबाण चिन्ह गोठवू शकते असे तज्ञ सांगतात. त्यामुळे यापुढे शिंदे गट आपले चिन्हं तलवार किंवा ढाल-तलवार ठेवेल असे संकेत मिळत आहेत.
शिंदे गटाने निशाणीची पर्यायी व्यवस्था केली ?
शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत एकत्र सत्तेत येत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का दिला तो म्हणजे थेट पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा ठोकला. पक्षाचं अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गट लढाई लढत आहे. त्यामुळे चिन्हाची लढाई कोण जिंकणार ? हे पाहणं महत्वाचं ठरेल. माञ शिंदे गटाने पर्यायी व्यवस्था केल्याची माहिती मिळत आहे. त्यानूसार शिंदे गट तलवार ठेवू शकते असे राजकीय अभ्यासक सांगतात.
का मिळत आहेत संकेत?
शिंदे गट पुढे आपली निशाणी तलवार किँवा ढाल तलवार ठेवण्याचे संकेत मिळत आहेत. कारण उद्या होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याच्या ठिकाणी शिंदे गटाने भव्य अशी 51 फुट तलावर ठेवली आहे. दसऱ्याला शस्त्राचे पूजन केले जाते , त्यामुळे आगामी वाटचालीसाठी शिंदे आपल्या गटासाठी या तलवारीची पूजा करून हे अस्त्र निशाणी म्हणून पुढे आणणार का हे पहाणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.तसेच एकनाथ शिंदे यांना ईतर नेते मंडळी चांदीची तलवार देखील भेट देणार आहेत अशी माहिती मिळतेय त्यामुळे आगामी काळात शिंदे गटाची निशाणी तलवार असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
मेळाव्यात तलवार कशासाठी असू शकते...?
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची शिवसैनिक हे चातकासारखी वाट पाहत असतात . त्यामध्ये शिवसेनेत यंदा मोठी फूट पडली आहे आणि दोन दसरा मेळावे होत आहेत. काही शिवसैनिक शिंदे गटाच्या मेळाव्याला तर काही शिवसैनिक हे गटाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये शिंदे हे जोरदार शक्ती प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण शिवसेनेत 40 आमदारांच्या बंडा नंतर मोठ्या प्रमाणात असंतोष हा शिवसैनिकांमध्ये देखील आहे आणि ते माझ्या पाठीशी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा असणार आहे. शिवसेनेत चिन्हावरूनही वाद सुरू आहे ,त्यामुळे चिन्ह मिळेल की नाही. त्यामुळे आलेल्या शिवसैनिकांना शिंदे तलवारी मंचावरून निशाणी म्हणून संकेत पुढे देऊ शकतात . कारण दसरा मेळावा हीच एक मोठी शिवसैनिकांना एकजुटीने विचार प्रसारित करण्याची संधी शिंदे गटाकडे आहे.
ढाल-तलवार ते रेल्वे इंजिन शिवसेनेने निवडणूक निशाणी म्हणून यापूर्वी घेतली होती -
शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. मात्र स्थापनेवेळी शिवसेना ही फक्त एक संघटना होती आणि राजकीय पक्ष म्हणून तिची नोंद केली गेली नव्हती. मात्र नोंद होण्यापूर्वी अनेक निवडणुका लढवताना शिवसेनेनं इतर वेगवेगळ्या चिन्हांवर लढवल्या होत्या. त्यात कप बशी ,ढाल तलवार, इंजिन अशी काही चिन्ह वापरण्यात आली होती.शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं ते 1989 साली. धनुष्यबाण मिळण्यापूर्वी अगदी कप-बशीपासून ते ढाल-तलवार पर्यंत अनेक चिन्ह घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी आपले उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उतरले होते.त्याचाच संदर्भ घेऊन पुढे शिवसेनेतील शिंदे गट तलवार किंवा ढाल तलवार हे चिन्ह घेऊ शकतात असे राजकीय विश्लेषक देखील सांगतात. त्यामूळे आता पुढे काय होतं हे पाहणं अहो औसुक्याचे ठरणार आहे.