एक्स्प्लोर

Eknath Shinde : दिंडीत वाहन घुसून वारकरी जखमी; वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले मुख्यमंत्री 

Eknath Shinde on Sangli Accident: वारकऱ्यांच्या तब्येतीची आणि त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांची स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली आहे.

Eknath Shinde on Sangli Accident:  दोन दिवसांपूर्वी मिरज-पंढरपूर मार्गावर नागजजवळ पायी चालत जाणाऱ्या दिंडीत एक चारचाकी वाहन घुसल्याने झालेल्या अपघातात 14 हून अधिक वारकरी जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्यांना मिरज मधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व वारकऱ्यांच्या तब्येतीची आणि त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांची स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली आहे. सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत.

तसेच ज्या वारकऱ्यांना गंभीर दुखापत झालीय या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवली असून याबाबतची कल्पना मुख्यमंत्री शिंदे यांनी  मिरजमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे  जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांच्याशी फोनवरुन बोलताना दिली आहे.

आषाढी वारी अगदी 4 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना मिरज-पंढरपूर मार्गावर नागज जवळील केरेवाडी फाट्याजवळ आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका वारकऱ्यांच्या दिंडीत जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले होते.

जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.
 
या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. आषाढी वारी अगदी 2-3 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पंढरपूरकडे जात असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे काही जखमी वारकऱ्यांची यंदा वारी मात्र चुकणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Union Budget 2025 : बजेटमधून सर्वसामान्यांना लक्ष्मी प्रसन्न झाली : एकनाथ शिंदेUnion Budget 2025 : Superfast : अर्थ बजेटचा ; अर्थसंकल्पातून कुणाला काय काय मिळालं? 01 February 2025CM Devendra Fadnavis On Union Budget :  मध्यमवर्गासाठी ड्रीम बजेट, आर्थिक इतिहासातला मैलाचा दगडUnion Budget 2025 : अर्थ बजेट : Nirmala Sitharaman : नव्या करप्रणालीत मोठे बदल, बजेटबाबात सोप्या भाषेत विश्लेषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
बाळासाहेब थोरात पडलेच कसे? राज ठाकरेंचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांनी मनसे प्रमुखांना डिवचलं; म्हणाले..
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले,
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?
Manikrao Kokate : भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
भाजपमध्ये गेले की आमदार होतात, मीच कसा झालो नाही? तो पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता; मंत्री माणिकराव कोकाटेंची तुफान फटकेबाजी!
Union Budget 2025 : इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
इलेक्ट्रिक गाडी घ्या अन् खिशात नवा स्मार्टफोन सुद्धा स्वस्तात घ्या, स्मार्ट टीव्ही सुद्धा आणखी आवाक्यात आला; बजेटमुळे काय काय बदलणार?
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Union Budget 2025: देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं
Virat Kohli Video : रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्... मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Video
Guillain Barre Syndrome : जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
Embed widget