Birthday Wishes To Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणं एकनाथ शिंदे यांनी टाळलं आहे.  एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना असे म्हणून त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना शिवसेना पक्षप्रमुख म्हणणं टाळलं आहे.






एकनाथ शिंदे यांनी जरी उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख म्हणणं टाळलं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक बंडखोर नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केला आहे. माजी मंत्री गुलाबराव पाटील, शिवाजी आढळराव पाटील, धैर्यशील माने यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना त्यांच्या नावाआधी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आहे.  


गुलाबराव पाटील यांनी काय म्हटलंय...






















बंडखोर नेत्यांच्या जाहिराती सामनानं नाकारल्या

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बंडखोर शिवसेना नेत्यांच्या जाहिराती सामनानं नाकारल्या आहेत. शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी हा दावा केला आहे. सामनात शुभेच्छांच्या जाहिराती
बंडखोरांकडून नकोत, असं सांगण्यात आलं असल्याची माहिती आहे. 


हारतुरे, पुष्पगुच्छ नको, फक्त शुभेच्छा द्या; उद्धव ठाकरे यांचं आवाहन 


शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे हे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Uddhav Thackeray : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!'; उद्धव ठाकरेंचा मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही हल्लाबोल


Uddhav Thackeray Interview : 'यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार


Uddhav Thackeray Interview : क्रॅम्प आला अन् मानेखालची हालचालच थांबली; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' अनुभव


Uddhav Thackeray Interview : माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या : उद्धव ठाकरे