CM Eknath Shinde Birthday Wishesh To Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून माजी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून तसेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना असे म्हणून त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे.






विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणं एकनाथ शिंदे यांनी टाळलं आहे. 


उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा


संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला. यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कालच्या भागातही त्यांनी शिंदे आणि बंडखोरांवर टीका केली होती. त्यामुळं आज  उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शिंदे नेमकं कशा शुभेच्छा देतात,याकडे लक्ष लागून होतं. उद्धव ठाकरे यांनी आजच्या मुलाखतीत म्हटलं आहे की, 'प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान... उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे. आता या टीकेला शिंदे नेमकं काय उत्तर देतात याकडे लक्ष लागून आहे.


हारतुरे, पुष्पगुच्छ नको, फक्त शुभेच्छा द्या; उद्धव ठाकरे यांचं आवाहन 
शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे हे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. 



इतर महत्वाच्या बातम्या


Uddhav Thackeray : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!'; उद्धव ठाकरेंचा मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही हल्लाबोल


Uddhav Thackeray Interview : 'यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार


Uddhav Thackeray Interview : क्रॅम्प आला अन् मानेखालची हालचालच थांबली; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' अनुभव


Uddhav Thackeray Interview : माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या : उद्धव ठाकरे