एक्स्प्लोर
ठाण्यात भात लावणीला एकनाथ शिंदे 6 तास लेट, महिलांचा संताप

ठाणे : भात लावणीच्या यंत्रांचा शुभारंभ करताना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट बांध गाठला. पण, दुपारीचा वेळ देऊन मंत्री महोदय पोहोचले थेट संध्याकाळी 6 वाजता. त्यामुळे त्यांची वाट पाहून कंटाळलेल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत झाला. महिला बचत गटांना भाडेतत्वावर अवजारं देण्याच्या उपक्रमासाठी शिंदे वडवळमध्ये येणार होते. याचवेळी त्यांना भात लावणीही करायची होती. पण, बांधावरुन शेती पाहण्याचा अनुभव असणारे मंत्रिमहोदय 1 वाजेचा वेळ देऊन पोहोचले थेट सायंकाळी 6 वाजता. जनतेला गृहित धरण्याची तशी नेत्यांची जुनीच सवय आहे. त्यामुळे कार्यक्रमांना उशिरा येण्यातच अनेक जण मोठेपण समजतात. पण, अतिदिरंगाई लोकांचाही मूड बदलू शकते याचाही विसर नेत्यांना पडू नये एवढेच.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
क्रिकेट























