एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पक्षानं अविश्वास दाखवल्यानं 40 वर्षांची तपश्चर्या वाया : खडसे
जळगाव : भोसरी जमीन घोटाळ्याच्या आरोपामुळं अडचणीत आलेल्या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पहिल्यांदाच पक्षावर थेट निशाणा साधला आहे. भाजपने अविश्वास दाखवल्यामुळे चाळीस वर्षांची तपश्चर्या धुळीस मिळाल्याची भावना खडसेंनी बोलून दाखवली.
जळगावच्या फैजपूर येथील मनपा शाळेच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर आले होते.
प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका, अशा आशयाचा सल्ला विनोद तावडेंनी उपस्थितांना दिला. मात्र, तावडेंच्या त्या वक्तव्यावर कोटी एकनाथ खडसेंनी सणसणतील टोला हाणला. भाजपनं प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवला आणि माझी चाळीस वर्षांची तपश्चर्या वाया घालवली, असा टोला खडसेंनी हाणला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement