एक्स्प्लोर

...तर जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेला तयार; एकनाथ खडसेंनी स्पष्टपणे सांगितलं...

खडसे परिवार जर गिरीश महाजन (Girish Mahajan)  आणि मंगेश चव्हाण (mangesh Chavan) यांना चालत असेल तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा करता येईल असं वक्तव्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले आहे.

Jalgaon Dudh Sangh Election: जळगाव दूध संघ निवडणुकीसाठी खडसे परिवार जर गिरीश महाजन (Girish Mahajan)  आणि मंगेश चव्हाण (mangesh Chavan) यांना चालत असेल तर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा करता येईल असं वक्तव्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले आहे. गुलाबराव पाटील यांचं गिरीश महाजन व मंगेश चव्हाण ऐकायला तयार असतील आणि त्यांना खडसे परिवार चालत असेल तर जिल्हा दूध संघ निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चेला तयारी असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. जळगाव जिल्हा दूध संघाची निवड संदर्भात खडसे यांनी पुढाकार घेतला असता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती असे मंत्री गुलाबराव पाटील म्हटलं होतं. त्यावर खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

आ मंगेश चव्हाण यांनी वारंवार आम्हाला खडसे परिवार चालत नाही, असे भाष्य केले. त्यावेळी त्यांना वेळेवर रोखणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही. असे झाले असते तर नक्कीच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मी पुढाकार घेतला असता असं सांगत एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.   

जळगाव दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ खडसे यांची कोंडी करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि काही आमदार मैदानात उतरल्याने एकनाथ खडसे एकटे पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  जळगाव जिल्ह्याचं राजकारण सध्या दूध संघाच्या निवडणुकीमुळे चांगलंच तापलं आहे. मागील सात वर्षाच्या काळापासून जळगाव दूध संघ एकनाथ खडसे समर्थकांच्या ताब्यात असल्याने त्यांच्या ताब्यातून दूध संघ घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.

यामध्ये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर त्यांच्या सोबतीला आघाडीच्या फळीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तर शिंदे गटाचे आ. चंद्रकांत पाटील हे खडसे यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.
 
दूध संघ ताब्यात घेण्यासाठी खडसे आणि गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचं पाहायला मिळत आहे.  या दोन्ही नेत्यांच्या मध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. 

एकनाथ खडसे एकटे पडले दिसत असले तरी त्यांची सहकार क्षेत्रावरील पकड पाहता भाजप-शिंदे गटासाठीही लढाई सोपी नाही. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे. 

पुढील महिन्यात दहा डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यात कायदेशीर लढाई अजून सुरूच आहे. न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर कोणाचे पारडे जड ठरते हे कळणार असले तरी आज मात्र काट्याचा संघर्ष यात पाहायला मिळत आहे.  

ही बातमी देखील वाचा

Jalgaon: जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत रणकंदन; एकनाथ खडसे एकटे पडले, तरीही विजयाचा विश्वास- कसं आहे राजकारण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Embed widget