एक्स्प्लोर
Advertisement
मुक्ताईदेवीच्या यात्रेसाठी जळगावात, नाराजीच्या चर्चेनंतर खडसेंचं स्पष्टीकरण
मुक्ताईदेवीच्या यात्रेसाठी जळगावात आपण जळगावात आलं असल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. नाराजीमुळे कॅबिनेट बैठकीला दांडी मारुन जळगाव दौऱ्याला गेल्याच्या चर्चेनंतर खडसेंनी स्पष्टीकरण दिलं. मंत्रिपदापेक्षा मुक्ताईदेवीचा सोहळा महत्त्वाचा असून यात्रेची तारीख आधीच निश्चित झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई : सलगच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांचं महसूल मंत्रिपद धोक्यात आल्याची माहिती माझाच्या सूत्रांनी दिलेली असतानाच आज कॅबिनेट बैठकीला दांडी मारुन खडसे जळगावला रवाना झाले आहेत.
मंगळवारी दिवसभर जळगावात खडसे काही कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. सततच्या आरोपांमुळे स्वतः खडसेदेखील नाराज झाल्याचं बोललं जात आहे. एकनाथ खडसेंमुळे सरकारवर डाग लागत असल्यामुळे त्यांचं महसूलमंत्रिपद काढून घेण्यात येणार असल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यासाठी खडसेंनी कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजेरी लावल्याची चर्चा आहे.
सोमवारी पुण्याच्या भोसरीमधल्या एमआयडीसीच्या भूखंडाप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुमारे 40 मिनिटे ही भेट झाली आणि याच भेटीनंतर एकनाथ खडसे यांचं महसूलमंत्रीपद रद्द होण्याच्या बातमीला पंख फुटले आहेत.
दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी खडसेंचा महसूलमंत्रिपदाचा भार काढून घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींनी राज्यातील सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वाचं लक्ष आहे.
खडसेंवरील आरोप
*कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, गजानन पाटीलला अटक
*जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप
*दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरचा दावा
* भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वाद
संबंधित बातम्या :
एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रिपद जाणार?
ती जमीन एमआयडीसीचीच, शिवसेनेचा खडसेंवर बाण
..म्हणून विरोधकांनी शकुनी नीती सुरु केली: एकनाथ खडसे
खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणी हॅकर मनिष भंगाळे हायकोर्टात
गंमत म्हणून 30 कोटींची लाच मागितली : गजानन पाटील
‘खडसे-दाऊद कथित कॉलप्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल’
खडसेंचा मोबाईल, दमानियांचा नंबर आणि दाऊद कॉल प्रकरण
खडसेंना क्लिन चीट, मग दाऊद कॉलप्रकरणात पुन्हा हॅकरची चौकशी का?
दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
‘आप’कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement