Eid Guidlines : बकरी ईद साधेपणाने साजरी करावी; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
बकरी ईद काळात कोणते नियम पाळावेत यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता गेल्या वर्षीपासून सर्व सार्वजनिक उत्सव, कार्यक्रम आणि सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी होत असला तरी अद्यापही धोका कायम आहे. येत्या 21 जुलै रोजी 'बकरी ईद'चा सण साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.
सरकारच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे,
1. कोरोनामुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा इदगाह किंवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांना आपल्या घरीच नमाज पठण करावं.
2. जनावरांचे बाजार बंद असल्याने नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा मोबाईलच्या माध्यमातून कॉल करुन जनावरे खरेदी करावीत.
3. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
4. सध्या लागू असलेल्या निर्बंधामध्ये बकरी ईद निमित्ताने कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही.
5. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये.
6. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.
राज्याच्या या मार्गदर्शक सूचना www.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

ईदचा सण म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण होय. गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही ईदवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन हा सण साजरा करण्यात यावा या अटीसह विशेष परवानगी देण्यात आली आहे. या काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर करावा असंही आवाहन करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- CM-Governor Letter : मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र, कोश्यारींनी उपस्थित केलेल्या तिन्ही मुद्द्यांना उत्तर
- Maratha Reservation : वटहुकूम आणि घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही, केंद्राने भूमिका स्पष्ट करावी; संभाजीराजेंची मागणी
- Maharashtra Government Jobs: नोकरी शोधताय? मग या ठिकाणी करु शकता अर्ज...
Before You Go
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
महत्त्वाच्या बातम्या






















