एक्स्प्लोर

अंडं महाग की कोंबडी?

हिवाळा सुरु झाला की प्रत्येक वर्षी अंड्यांच्या दरांमध्ये वाढ होतच असते. मात्र यावेळी झालेली वाढ आश्चर्यचकित करणारी आहे. जे अंडं काही दिवसांपूर्वी चार ते साडेचार रुपयांना मिळत होतं, तेच अंडं आता सात ते साडेसात रुपयांना विकलं जातं आहे.

पुणे : ‘अंडं आधी की कोंबडी आधी?’ असं गमतीनं विचारलं जातं. परंतु आता ‘अंडं महाग की कोंबडी महाग?’ असं विचारण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये अंड्यांच्या दरांमध्ये सातत्याने झालेली वाढ. सध्या एका अंड्यासाठी सात ते साडेसात रुपये मोजावे लागत आहेत. त्याच्या तुलनेत चिकन मात्र स्वस्त झालं आहे. हिवाळा सुरु झाला की प्रत्येक वर्षी अंड्यांच्या दरांमध्ये वाढ होतच असते. मात्र यावेळी झालेली वाढ आश्चर्यचकित करणारी आहे. जे अंडं काही दिवसांपूर्वी चार ते साडेचार रुपयांना मिळत होतं, तेच अंडं आता सात ते साडेसात रुपयांना विकलं जातं आहे. अंड्यांच्या मागणीमध्ये वाढ झालेली असली तरी त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यानं ही वाढ झाल्याचं सांगितलं जातं आहे. अंड्यांच्या या दरवाढीसाठी कारणं जरी काहीही सांगितली जात असली, तरी नोव्हेंबर महिन्यात अचानक झालेली ही वाढ आतापर्यंतची सर्वोच्च वाढ आहे. ऑक्टोबर महिन्यात शंभर अंड्यांसाठी 415 रुपये मोजावे लागत होते. मात्र आता त्यासाठी 519 रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे ब्रॉयलर चिकनचे दर मात्र सातत्यानी कमी होत आहेत. सध्या एक किलो ब्रॉयलर चिकनसाठी 130 ते 135 रुपये मोजावे लागत आहेत. अंड्यांच्या वाढलेल्या दरांची तुलना चिकनच्या दरांशी होत असली तरी अंडं देणारी कोंबडी आणि खाण्यासाठी वापरली जाणारी  ब्रॉयलर कोंबडी यांच्यामध्ये फरक आहे. अंड देणारी कोंबडी 18 आठवड्यांची झाल्यानंतर अंडं देण्यास सुरुवात करते, तर या उलट ब्रॉयलर कोंबडी जन्मल्यानंतर 40 ते 42 दिवसांमध्ये 2 किलोपर्यंत वाढून खाण्यायोग्य होते. थंडीमध्ये ब्रॉयलर कोंबडीच्या वाढीचा वेग आणि वजन या दोन्हींमध्ये वाढ होते. थंडीच्या दिवसांमध्ये  35 ते 38 दिवसांमध्ये कोंबडीच वजन अडीच किलोपर्यंत वाढतं. त्यामुळे सहाजिकच चिकनचं उत्पादन वाढून दर कमी झाले आहेत. अंड्यांच्या वाढलेल्या दरांमुळे साहजिकच अंड्यांच्या मागणीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये अंड्यांच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता आहे. इतर सर्व वस्तूंप्रमाणे मागणी आणि पुरवठ्याचे नियम चिकन आणि अंड्यांनाही लागू होतात. परंतु बाजारपेठेच्या चढ-उतारांबरोबरच अंडी आणि चिकनच्या दरांवर सण, उत्सव, उपवासाचे दिवस अशा गोष्टींचाही परिणाम होत असतो. जुलै महिन्यापासून वेगवेगळे सण सुरु होतात. श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि आता नुकताच सुरु झालेला मार्गशीर्ष महिन्यात शाकाहारी राहण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे या काळात चिकनची मागणी घटते. अंडयांच्या बाबतीत मात्र अंड हे व्हेज की नॉनव्हेज हा वाद आता संपुष्टात येऊन अनेकजण अंड्याचा समावेश शाकाहारामध्ये करतात. त्यामुळे प्रत्येक हंगामात अंड्यांना मागणी असते.

महत्त्वाच्या बातम्या

Pradeep Purnekar Death Case मित्रानेच काटा काढला, गोळीबारानंतर रुग्णालयातही घेऊन गेला; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात नवा अँगल
मित्रानेच काटा काढला, गोळीबारानंतर रुग्णालयातही घेऊन गेला; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात नवा अँगल
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
Tukaram Mundhe Slams Celebrites Paan Gutka Advertise: 'आधी तुमच्या मुलांना गुटखा खायला द्या, त्यांनाही सवय लावा...'; तुकाराम मुंढे पान-मसाल्याची जाहीरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर संतापले
'आधी तुमच्या मुलांना गुटखा खायला द्या, त्यांनाही सवय लावा...'; तुकाराम मुंढे पान-मसाल्याची जाहीरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर संतापले
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एमपीएससी विद्यार्थ्यांसमवेत बैठक
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एमपीएससी विद्यार्थ्यांसमवेत बैठक

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
Rule Change: एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
Supreme Court on Firecracker Verdict: मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
Gold Silver Rate: आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दरही कोसळले, दोन दिवसांमध्ये 'इतक्या' हजारांनी झाले कमी, जाणून घ्या आजचे दर
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दरही कोसळले, दोन दिवसांमध्ये 'इतक्या' हजारांनी झाले कमी, जाणून घ्या आजचे दर
Embed widget