एक्स्प्लोर
दुरांतो एक्सप्रेसवर दरोडा, प्रवाशांचे दागिने, पैसे लांबवले
म्हसावद पोलीसांनी या घटनेची पाहणी केली असून घटनेचा तपास भुसावळ रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे.

नागपूर : जळगावजवळील माहेजी स्टेशनवर उभ्या असलेल्या दुरांतो एक्सप्रेसवर दरोडा टाकला. गुरुवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ही घटना घडली. यात अनेक प्रवाशांच्या पैसे आणि दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला. जळगावकडून मुंबईकड़े जाणारी दुरांतो एक्स्प्रेस मध्यरात्री अडीच वाजता माहेजी स्टेशनजवळ उभी होती. त्याचवेळी एक्स्प्रेसवर दरोडा पडला. यात अनेक प्रवाशांच्या दागिने आणि पैसे दरोडेखोरांनी लुटले. तर दरोडेखोरांनी नागपूरच्या अनिता चिंचोरिया या महिलेची सोन्याची पोत लांबवली. या प्रकरणी नागपूरच्या एका महिलेने इगतपुरी रेल्वे पोलीस स्थानकात तक्रारी नोंदवली आहे. तक्रारीनुसार रेल्वे पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. एक्स्प्रेसमधील अन्य प्रवासी कल्याणला तक्रार देणार असल्याचे इगतपुरी पोलिसांनी सांगितले. म्हसावद पोलिसांनी या घटनेची पाहणी केली असून घटनेचा तपास भुसावळ रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























