एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिक महामार्गावर कसाऱ्याजवळ पेट्रोल चोरी, पेट्रोल पंप सील
कसारा: मायक्रो चिपच्या सहाय्यानं पेट्रोल चोरी होत असल्याचं समोर आल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेनं राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोलपंपांवर धाडी टाकणं सुरू केलं असून आत्तापर्यंत जवळपास १२ पेट्रोलपंप या कारवाईत सील करण्यात आले आहेत. याच कारवाईत आज (बुधवार) मुंबई-नाशिक महामार्गावर कसाऱ्याजवळ असलेल्या लाहे गावात इंडियन ऑईलच्या पेट्रोलपंपावर धाड टाकण्यात आली.
मुंबई-नाशिक महामार्गाला लागूनच असलेल्या दुर्गा ऑटो पेट्रोलपंपवर वाहनांची मोठी गर्दी असते. आज सकाळी ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या नेतृत्त्वाखाली या पंपावर अचानक धाड टाकण्यात आली.
यावेळी चीप आणि पासवर्डच्या सहाय्यानं इथं पेट्रोल आणि डिझेलची चोरी होत असल्याचं उघड झालं. पेट्रोलमध्ये ५ लिटरमागे १०० मिली आणि डिझेलमध्ये ५ लिटरमागे १७० मिलीची लूट इथं होत होती. हा सगळा प्रकार गुन्हे शाखेनं समोर आणत पेट्रोल पंप सील केलं.
संबंधित बातम्या:
चिपनंतर आता पासवर्डच्या मदतीनं पेट्रोलचोरी, 2 पेट्रोलपंप सील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement