एक्स्प्लोर

राज्यात मिश्र खतांमध्ये राख मिसळली जातेय, कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा गंभीर आरोप

या बोगस खतांच्या विक्रीविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितलं आहे. आता यापुढे ज्या जिल्ह्यात असा प्रकार आढळेल त्या जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्याचं पथक धाड टाकेल, असेही त्यांनी सांगितले.

अमरावती : राज्यात मिश्र खतांमध्ये राज्यात मिश्र खतांमध्ये राख मिसळली जात असल्याचा गंभीर आरोप कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. बियाणं जर उगवलं नाही तर शेतकऱ्याचं वर्ष वाया जाते. त्यामुळे हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे, असेही डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी सांगितलं. या बोगस खतांच्या विक्रीविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितलं आहे. आता यापुढे ज्या जिल्ह्यात असा प्रकार आढळेल त्या जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्याचं पथक धाड टाकेल, असेही त्यांनी सांगितले. असे प्रकार आढळून आल्यास शेतकऱ्यांनी थेट माझ्या नंबरवर माहिती द्यावी. ती माहिती गुप्त ठेवून तातडीने भरारी पथक पाठवून छापा मारण्यात येईल, असेही कृषी मंत्री बोंडे यावेळी म्हणाले. एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आला आहे आणि दुसरीकडे बोगस बियाणे विकणाऱ्यांचा मार्केटमध्ये सुळसुळाट झालाय. राज्यात ह्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. नुकतीच ह्या पथकांनी करोडोची बोगस बियाणे वेगवेगळ्या धाडीत जप्त केली आहेत. ह्यातील जास्तीत जास्त बोगस बियाणे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. एकट्या विदर्भात नागपूर विभागात एक कोटींच्यावर तर अमरावती विभागात 1.78 लाखांची बोगस बियाणे ह्या हंगामाच्या तयारीदरम्यान पकडली गेली आहेत. बोगस बियाण्यांच्या विक्रीचं थेट कनेक्शन आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशात आहे. हा सर्व व्यवसाय जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून चालत असल्याचं काही धाडीतून सिद्ध झालं आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना कमी किमतीत बोगस बियाणे देऊन दामदुप्पट पैसे उकळणाऱ्या टोळ्या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांतील शेतकऱ्यांना लक्ष्य करून आकर्षक रंगाच्या पॅकेजमधील माल शेतकऱ्यांना पुरवला जातो आहे. ह्या बोगस बियाणांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच अपुरी आहे. कृषी विभागाकडून भरारी पथक स्थापन केली आहेत. मात्र, त्यातही कर्मचाऱ्यांची मर्यादा असते. तपासासाठी वाहनं नाहीत. कृषी केंद्राच्या संचालकांना मिळणाऱ्या कमिशनमुळे धाडी टाकूनही त्यामागचे मास्टरमाईंड सापडत नाहीत. त्यामुळं दरवर्षी बोगस बियाण्यांची खरेदी करून शेतकऱ्यांना फसवले जात आहे. हे बियाणे जर पेरण्यात आले असते तर याचा पेरा हा चार हजार हेक्टरहून अधिक राहिला असता. ह्यातील जास्तीत जास्त बियाणे कापूस पिकाची होती. ज्या पद्धतीने ही बोगस बियाणे विकणारी आंतरराज्य टोळी कार्यरत आहे, ते बघता पकडलं गेलेलं तेवढंच बोगस बियाणे आहे, असे मुळीच म्हणता येणार नाही. उलट यापेक्षा कितीतरी पटीने बोगस बियाणे ह्या हंगामात शेतकऱ्यांजवळ पोहचेल, अशी शक्यता आहे.  यंत्रणा कमी असल्यामुळे ह्या जाळ्यातून जर वाचायचे असेल तर शेतकऱ्यानेच आपण कुठले बियाणे घेत आहोत ह्याबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget