एक्स्प्लोर

Drug Case: मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक करण्यात आली आहे. ड्रग्स कनेक्शनमध्ये आरोपी करण सजनानीच्या चौकशीत नाव आल्याने समन्स पाठवून चौकशीला बोलावण्यात आले होते.

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक करण्यात आली आहे. उद्या सकाळी त्यांना कोर्टात हजर केलं जाईल, अशी माहिती आहे. ड्रग्स कनेक्शनमध्ये समीर खान यांना अटक झाली आहे. आरोपी करण सजनानीच्या चौकशीत नाव आल्याने समन्स पाठवून चौकशीला बोलावण्यात आले होते. सकाळी 10 पासून समीर खान यांची चौकशी सुरू होती. दहा तासाहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान समीर खान यांच्या अटकेनंतर नवाब मलिक यांची तातडीनं मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने समन्स पाठवलं होतं, त्यांची आज सकाळपासून चौकशी सुरु आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानीच्या चौकशीदरम्यान समीर खान यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबीने समीर खान यांना समन्स पाठवलं. त्यानुसार समीर खान आज सकाळी एनसीबी कार्यालयात हजर झाले होते.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची एनसीबीकडून चौकशी

एनसीबी सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात शनिवारी एनसीबीने करण सजनानी नावाच्या आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराला अटक केली होती. त्याच्याकडून 200 किलो गांजाही जप्त करण्यात आला होता. त्याचप्रकरणी चौकशीदरम्यान बऱ्याच लोकांचं नाव समोर आलं होतं. त्यात समीर खान यांचंही नाव असल्याचं उघड झालं. त्यामुळे मंगळवारी (12 जानेवारी) रात्री आठच्या सुमारास एनसीबीच्या एक टीमने वांद्र्यात जाऊन समीर खान यांना समन देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार समीर खान आज (13 जानेवारी) सकाळी साडेआठ वाजता चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात हजर झाले. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.

करण सजनानी ड्रग्स कनेक्शनमध्ये समीर खान यांच नाव समोर आलं होत. त्यानुसार आम्ही त्यांना चौकशीला बोलवलं आणि त्यांचा सहभाग संशयास्पद आढळल्याने अटक केलेली आहे. उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. याच प्रकरणात वांद्रेमधून एका व्यक्तीला एनसीबी कार्यालयात आणण्यात आले आहे त्याचीही चौकशी सुरू आहे. समीर खान आणि करण सजनानी यांच्यात किरकोळ रकमेचे व्यवहार झाले नसून ते मोठे आहेत. शिवाय समीर खानने ड्रग्स सेवन केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्या आधारे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान याच प्रकरणी एनसीबीने मुंबईतील मुच्छड पानवाला यालाही समन्स बजावला होता. त्यानंतर चौकशी करुन त्याला अटक करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget