एक्स्प्लोर

Pradip Kurulkar : कुरुलकरच्या लॅपटॉपमधे नग्न फोटो आढळले; एटीएसकडून 2000 पानांचं दोषारोप पत्र दाखल

DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात एटीएसने 2000 पानांचं दोषारोप पत्र दाखल केलं आहे. कुरुलकर हे नग्न होऊन एकमेकांशी चॅटिंग करायचे त्याचे फोटो लॅपटॉपमधे आढळून आले आहेत.

Pradip Kurulkar : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप असलेले DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात एटीएसने 2000 पानांचं दोषारोप पत्र पुण्यातील विशेष न्यायालयात दाखल केलं आहे. त्याचबरोबर कुरुलकरांची पॉलिग्राफ आणि व्हॉईस क्लीअर अॅंड सायकॉलॉजिकल टेस्ट करण्यास परवानगी देण्याची मागणीही एटीएसकडून न्यायालयात करण्यात आली आहे. या मागणीवर आता 7 जुलैला सुनावणी होणार आहे.  झारा दासगुप्ता आणि कुरुलकर हे नग्न होऊन एकमेकांशी चॅटिंग करत होते आणि त्याचे फोटो कुरुलकरच्या लॅपटॉपमधे आढळून आले आहेत.

ATS च्या दोषारोपपत्रात  काय आहे?

डीआरडीओचे संचालक असताना प्रदीप कुरुलकर हे झारा दासगुप्ता या महिलेशी मोबाईल वॉट्सअप आणि ईमेलच्या माध्यमातून संपर्कात होता. झारा दासगुप्ता या नावाने बनावट अकाऊंट पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांकडून चालवण्यात येत होतं. कुरुलकरांनी झारा दासगुप्ताला भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमेबद्दल संवेदनशील माहिती दिली. कुरुलकर भारताच्या डीआरडीओच्या वेगवेगळ्या लॅबोरेटरीजची माहिती देखील पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणाना देत होता. ज्या कालावधीत कुरुलकर झारा दासगुप्ताच्या संपर्कात होता त्याच कालावधीत तो सातवेळा विशेष पासपोर्टवर परदेशात जाऊन आला आहे. कुरुलकर झारा दास गुप्ताला संवेदनशील माहिती जशी देत होता त्याचबरोबर तिच्याशी अश्लील भाषेत चॅटिंग देखील करत होता. झारा दासगुप्ता आणि कुरुलकर हे नग्न होऊन एकमेकांशी चॅटिंग करत होते आणि त्याचे फोटो कुरुलकरच्या लॅपटॉपमधे आढळून आले आहेत. प्रदीप कुरुलकर यांनी डी आर डी ओची आणखी कोणती संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिलीय याचा तपास ATS कडून सुरुच राहणार आहे.

अनेक महिलांना भेटत होते कुरुलकर...

DRDO च्या मुंबईतील सांताक्रुझ भागातील गेस्ट हाऊसमध्ये प्रदीप कुरुलकर हे सातत्यानं महिलांना भेटत असल्याचं समोर आलं होतं. यातील एकही महिला त्यांच्या नात्यातील किंवा DRDO मध्ये कर्मचारी नव्हती. ऑक्टोंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत कुरुलकर ज्यावेळी सांताक्रूझमधील गेस्ट हाऊसला राहिले त्यावेळचं सीसीटीव्ही तपासलं असता ही धक्कादायक माहिती समोर आली होती.  कुरुलकर रात्रीच्या वेळी मुंबईच्या गेस्ट हाऊसमध्ये भेटलेल्या महिलांची संख्या एक - दोन नाही तर त्याहून अधिक आहे. या महिला त्यांच्या परिचयाच्या आहेत. त्या नातेवाईक किंवा DRDO मध्ये काम करत नाहीत. ज्या कालावधीत कुरुलकर झारा दासगुप्ता या पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात होते त्याच कालावधीत झालेल्या या गेस्ट हाऊसमधील भेटी आहेत. त्यामुळं त्यांचा काही परस्पर संबंध आहे का? याचा एटीएस तपास करत आहेत. 

हेही वाचा-

Dr. Pradip Kurulkar Spy Case : ना नातेवाईक, ना DRDO चे कर्मचारी; कुरुलकर नेमके गेस्ट हाऊसमध्ये कोणत्या महिलांना भेटायचे?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Sukhbir Singh Badal Nanded News: सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget