एक्स्प्लोर

Narendra Dabholkar Murder Case : डॉ.दाभोलकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाकडून जामीन

सनातन संस्थेचा सदस्य असलेल्या विक्रम भावेला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड प्रकरणात सीबीआयनं अटक केली होती. सीबीआयनं जामिनावर मागितलेली स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिला. 1 लाखांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेत.

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला. याप्रकरणी सीबीआयचा तपास अद्याप सुरू आहे. आरोपीविरोधात आरोप निश्चित होणं आणि खटल्याला सुरूवात होणं या गोष्टी नजीकच्या काळात तरी शक्य नाहीत. आणि आरोपीविरोधात नव्यानं साक्षीपुरावे सापडणं आणि नवे आरोप लागणंही शक्य नाही, असा युक्तिवाद बचावपक्षानं हायकोर्टात केला होता, जो ग्राह्य धरला गेला. मागील दोन वर्षापासून सीबीआयच्या केसमध्ये विक्रम भावे अटकेत होता. साल 2013 मध्ये पुण्यात डॉ. दाभोलकर यांची सकाळी मॉर्निंग वॉकदरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयनं आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर या दोघांना घटनास्थळाची रेकी करण्यासाठी आणि गुन्हा केल्यानंतर तिथून फरार होण्यासाठी विक्रम भावेनंच मदत केली होती असा आरोप तपासयंत्रणेनं ठेवला आहे. 

न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठानं आपला राखून ठेवलेला जामीनावरील निकाल गुरूवारी जाहीर केला. भावेला एक लाख रुपयांचा व्यक्तिगत जामीन मंजूर करताना पुढील एक महिना दररोज तपास अधिकाऱ्यांपुढे हजेरी, त्यानंतर पुढचे दोन महिने एक दिवसाआड हजेरी लावणं अनिवार्य राहील. तसेच खटल्याला नियमित हजेरी लावणं, साक्षी पुरावे प्रभावित न करणं, कोणतेही गैरक्रृत्य न करणं आणि पुणे सत्र न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास मनाई केली आहे. यापैकी एकही अट मोडल्यास जामीन रद्द करण्यात येईल असंही हायकोर्टानं आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे. सीबीआयच्यावतीने अॅड. संदेश पाटील यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी तूर्तास स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र हायकोर्टानं ही मागणी फेटाळून लावली.

डॉ. दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 रोजी झाली. आरोपी शरद कळसकरनं सीबीआयला दिलेल्या जबाबानंतर याप्रकरणी अॅड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावेला मे 2019 मध्ये अटक केली होती. पुनाळेकर यांना पुणे सत्र न्यायालयानं काही दिवसांत जामीन मंजूर केला होता. मात्र विक्रम भावेचा थेट सहभाग असल्याच्या आरोपावरून त्याचा जामीन न्यायालयानं नामंजूर केला होता. त्यामुळे भावेनं मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी याचिका दाखल केली. 

 कोण आहे विक्रम भावे -

हिंदू विधिज्ञ परिषदेत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम पाहणारा अशी विक्रम भावेची मूळ ओळख आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयनं सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि हिंदू जनजागृती समितीचे सदस्य वीरेंद्र तावडे यांची चौकशी केली होती. ज्यातून विक्रम भावेला अटक करण्यात आली होती. डॉ. दाभोलकर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप विक्रम भावेवर असून दाभोलकरांची ओळख पटवण्यात विक्रम भावेचा सहभाग होता. तसेच दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल नष्ट करण्यातही भावेनंच मदत केल्याचा आरोपावरून त्याला अटक झाली होती. याआधी ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि पनवेलमधील थिएटरमध्ये 4 जून 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी विक्रम भावेला दोषी ठरवण्यात आलं होतं. ज्यात त्याला 10 वर्षांची शिक्षाही झाली आहे. मात्र मधल्या काळात त्याची जामिनावर सुटका झाली असताना तो या कटात सामील झाला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget