एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडी 21 जूनपर्यंत वाढवली
पुढच्या नियमित सुनावणीस या खटल्यातील एक वकील उपलब्ध नसल्यानं कोर्टानं आरोपींना 21 जूनपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. तसेच आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी 17 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली.
कोर्टाचे हे निर्देश ऐकताच या प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांचा संयम सुटला आणि, 'जेलसारख्या भयानक ठिकाणी आता राहू शकत नाही, आम्हाला इथून मुक्त करा. आम्ही काहीही केलेलं नाही', असा टाहो फोडण्यास त्यांनी सुरूवात केली.
शेवटी वकिलांनी समजवल्यानंतर काहीवेळानं त्या शांत झाल्या. पुढच्या नियमित सुनावणीस या खटल्यातील एक वकील उपलब्ध नसल्यानं कोर्टानं आरोपींना 21 जूनपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान तडवी कुटुंबियांच्यावतीनं हे प्रकरण अॅट्रॉसिटीचं असल्यानं या सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी केली. कोर्टानं ही विनंती मान्य करत पोलीस तसेच कोर्ट कर्मचा-यांना व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
डॉ. पायलने नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी तिच्या तीन सहकारी महिला डॉक्टरांना अटक केली आहे.
यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्टरांवर रॅगिंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement